Home /News /maharashtra /

मोठी बातमी: एकनाथ शिंदेच नाही तर राष्ट्रवादीचे आमदारही भाजपासोबत जाण्याच्या तयारीत

मोठी बातमी: एकनाथ शिंदेच नाही तर राष्ट्रवादीचे आमदारही भाजपासोबत जाण्याच्या तयारीत

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या समर्थक आमदारांसोबत भाजपाशी युती करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) देखील भाजपासोबत जाण्याच्या तयारीत आहेत

    मुंबई, 22 जून : राज्याच्या राजकारणाला गेल्या दोन दिवसांपासून मोठी कलाटणी मिळाली आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारलंय. शिंदे त्यांच्या समर्थक आमदारासोबत गुवाहाटीमध्ये आहेत. शिवसेनेचे 43 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत भाजपाशी युती करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील भाजपासोबत जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती आहे. राष्ट्रवादी नेते याबाबत अध्यक्ष शरद पवारांकडे (Sharad Pawar) मत मांडणार आहेत. अजित पवार यांच्या दालनात एनसीपी नेत्यांची बैठक सुरू आहे. राज्य मंत्रीमंडळची बैठक संपताच दुसरी बैठक झाली. पवार काय घेणार निर्णय? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यापूर्वी 2019 साली पक्षातून बंड करत भाजपाशी हातमिळवणी केली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यंंत्री असा शपथविधी देखील झाला होता. पण, अजित पवारांचे हे बंड फक्त 36 तास टिकले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा न दिल्यानं अजित पवार यांना तेव्हा माघार घ्यावी लागली होती. यंदा तो प्रकार घडू नये म्हणून राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार यांच्याकडे आपली भूमिका मांडणार आहेत. अजित पवार सावध एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३३ आमदार घेऊन सुरत व्हाया गुवाहाटीला पोहोचले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ४७ आमदार असल्याचा दावा करत आहे. तर भाजपही या मोहिमेत सामिल झाली आहे. पण, दुसरीकडे मात्र अजित पवार हे आपल्या कामात व्यस्त आहे. आज मंत्रिमंडळात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. त्यानंतर आता ते मुख्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला रवाना झाले आहे. त्यावेळी पत्रकारांनी सत्ता नाट्यावर विचारले असता, मी माझं काम करत आहे, बैठकीला बोलावलं आहे, तर मी चाललो आहे, सत्तानाट्यावर मी काही बोलू शकत नाही, 'नो कमेंट्स'असं उत्तर देऊन अजितदादा बैठकीला निघून गेले होते. पाचच्या आत घरात या! ..अन्यथा परिणामांना तयार राहा, शिवसेनेचं आमदारांना अल्टिमेटम अजित पवारांनी अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला असला तरी राज्य मंत्रीमंडळची बैठक संपताच त्यांच्या दालनात वेगळी बैठक झाली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी राज्य सरकारचं भवितव्य देखील स्पष्ट होईल.  त्यामुळे गुरूवारच्या बैठकीत शरद पवार काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Ajit pawar, Eknath Shinde, NCP, Uddhav Thackery, शरद पवार. sharad pawar

    पुढील बातम्या