जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पाचच्या आत घरात या! ..अन्यथा परिणामांना तयार राहा, शिवसेनेचं आमदारांना अल्टिमेटम

पाचच्या आत घरात या! ..अन्यथा परिणामांना तयार राहा, शिवसेनेचं आमदारांना अल्टिमेटम

पाचच्या आत घरात या! ..अन्यथा परिणामांना तयार राहा, शिवसेनेचं आमदारांना अल्टिमेटम

शिवसेनेनं बंडखोर आमदारांना मोठा इशारा दिला आहे. शिवसेना आमदारांची तातडीची बैठक आज संध्याकाळी (बुधवार) वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 जून : राज्यातील सत्तानाट्याचा आज दुसरा दिवस आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदारांना घेऊन यापूर्वी सुरत गाठले आणि नंतर आता गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला आहे. शिंदे यांनी बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं बंडखोर आमदारांना मोठा इशारा दिला आहे. शिवसेना आमदारांची तातडीची बैठक आज संध्याकाळी (बुधवार) वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थिती आवश्यक असल्याचा आदेश पक्षानं या आमदारांना दिला आहे. या बैठकीची सूचना विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवली आहे.त्याशिवाय सोशल मीडिया, व्हॉट्सअप आणि एसएमएसद्वारेही आमदारांना कळवण्यात आले आहे.या बैठकीस लिखित स्वरूपात वैध आणि पुरेशी कारणे दिल्याशिवाय गैरहजर राहता येणार नाही, असा इशारा पक्षानं दिला आहे. या बैठकीला उपस्थित न राहिल्यास शिवसेना सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा आहे, असं मानले जाईल असा इशारा शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आला आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी हे पत्रक काढले आहे.

News18

मंत्रिमंडळ बैठकीत 13 प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. एकूण १३ प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. या प्रस्तावावर चर्चा झाली आहे. तर. ‘काही ही झालं नाही. मुख्यमंत्री नेहमी प्रमाणे आले आणि बैठक झाली. तुम्ही चुकीच्या बातम्या करतात. आमदार शिवसेनेचे गेले आहे. सरकार सद्या सुरू आहे, अशी सूचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाला हवा नेमकी कुणाची? उद्धवच तर नाही शिल्पकार? काय आहे कन्सपिरसी थेअरी! एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधातच मोठे बंड पुकारले आहे. सर्व आमदारांना घेऊन शिंदे हे आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ३३ आमदारांची फौज आहे. एकनाथ शिंदे हे आज राज्यपालांना भेटून प्रस्ताव देण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात