मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शरद पवार मोहिते पाटलांना हिसका दाखवणार? सोलापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट

शरद पवार मोहिते पाटलांना हिसका दाखवणार? सोलापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट

रणजितसिंह मोहिते पाटील यांना हिसका दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नवा डाव टाकणार का?

रणजितसिंह मोहिते पाटील यांना हिसका दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नवा डाव टाकणार का?

रणजितसिंह मोहिते पाटील यांना हिसका दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नवा डाव टाकणार का?

सोलापूर, 9 मे : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. मात्र पक्षातून बाहेर पडलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना हिसका दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नवा डाव टाकणार का, याची चर्चा रंगू लागली आहे.

डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी द्या, अशा आशयाचे पत्र माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहे. डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. यासाठी तरुण, उच्चविद्याविभूषित डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना विधानपरिषद निवडणुकांमध्ये विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांची नेमणूक व्हावी, अशी विनंती आमदार शिंदे यांनी केली आहे .

लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर मोहिते-पाटील गटाने रणजीतसिंह निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. पण त्यावेळी शरद पवारांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर उद्या ते संघाच्या चड्डीत दिसणार का ? अशी टीका केली होती. त्याला जयसिंह मोहिते -पाटील यांनी कुस्ती खेळणारा पैलवान लंगोट लावून असतो, मैदान सोडून जात नाही (पवारांची माढा लोकसभा निवडणुकीतून माघार ) असे म्हणत उत्तर दिले होते.

साहेब, कुठून आली एवढी माणुसकी! काळजात घर करेल या फोटोमागची कहाणी

त्यामुळे लोकसभेतील राष्ट्रवादीच्या पराभवाचं उट्ट काढण्यासाठी आणि जिल्हात पक्षाला बळकट करण्यासाठी शरद पवार हे सोलापूरमधून तगडा उमेदवार देणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत अल्पशा मताने पराभव पत्करावा लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासमोर बलाढ्य अशा भारतीय जनता पार्टीचे तगडे आव्हान उभे होते. परंतु डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी झंझावती प्रचार दौरा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना मोलाची साथ दिली होती. याचबरोबर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विजयात डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांचा मोठा वाटा आहे.

..नाहीतर मालेगावमध्ये कोरोनामुळे ओढावेल मोठा अनर्थकोरोना योद्धे आहेत 'पाठकबाईं'चे आई-वडील; अक्षया देवधरबरोबर दिलखुलास गप्पा

First published:

Tags: Sharad Pawar (Politician), Solapur (City/Town/Village)