साहेब, कुठून आली एवढी माणुसकी! काळजात घर करेल या फोटोमागची कहाणी

साहेब, कुठून आली एवढी माणुसकी! काळजात घर करेल या फोटोमागची कहाणी

विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना समोर आली असून खाकी वर्दितली कर्तव्यापलिकडची माणुसकी पाहायला मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई, 09 मे : कोरोनामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार परसरला असताना पोलीस विभाग मात्र आपला जीव घोक्यात घालून काम करत आहे. या खाकी वर्दीतली माणूकसी आपण सगळ्यांनी पाहिली आहे. असाच एका मनाला घर करणारा प्रकार मुंबईच्या विरारमध्ये समोर आला आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना समोर आली असून खाकी वर्दितली कर्तव्यापलिकडची माणुसकी पाहायला मिळाली आहे.

विरार पूर्वेकडील फुलपाडा इथे प्रमोद खारे, वय 45 यांचं तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल. मात्र, कोणीही नातेवाईक लॉकडाऊनमुळे येऊ न शकल्याने पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी स्वतः मृतदेहावर अंतिम संस्कार करून नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करून दर्शन घडवलं.

फुलपाडा इथले प्रमोद खारे हे घरी एकटेच असतात. त्यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. पण लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचे नातेवाईक कोलकाता आणि दिल्लीवरून अंत्यसंस्कारासाठी येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही नव्हतं. मात्र, पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी मयत प्रमोद खरे यांचा बंद झालेला मोबाईल चार्ज करून नातेवाईकांशी संपर्क साधला.

लॉकडाऊनमध्ये हत्येचा थरार, तलवारी आणि बंदुकीनं एका क्षणात पाडले 5 मृतदेह

लॉकडाऊनमुळे नातेवाईकांना येण्यासाठी एक दिवस प्रेत राखून ठेवलं मात्र, त्यांना येता आलं नाही. नातेवाईकांनी पोलीस सुभाष यांना अंतिम संस्कार करण्यास विनंती केली आणि अखेरच दर्शन व्हिडीओ कॉलद्वारे घेऊन साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. अशा या योध्याने केलेल्या कामाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्यांच्या या माणूसकिचं सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

LIVE VIDEO: चॉपर दाखवून पळत सुटला, नंतर केले वार; मुंबईत 3 पोलीस जखमी

संपादन - रेणुका धायबर

First published: May 9, 2020, 6:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या