मालेगाव, 09 मे : कोरोनाचा विस्फोट झालेल्या मालेगाव शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. प्रशासकीय अधिकारी नियमित आढावा बैठक घेत असले तरी प्रत्यक्षात निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने कृषिमंत्री नाराज असल्याचं बोललं जात आहे. अशात कोरोना रुग्ण सतत वाढत असल्याने इतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ही परिस्थिती जर वेळीच आटोक्यात आणली नाही तर मालेगावमध्ये अनर्थ ओढवेल असं म्हणायला हरकत नाही. शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कृषिमंत्री भुसे हे त्यांच्या संपर्क कार्यालयासमोरील हनुमान मंदिरात आले. तर काही निवडक पदाधिकारी थोड्या अंतरावर शांत उभे राहिले. कुणाचाच कुणाशी संवाद नाही. चिंताजनक व नाराजगीयुक्त असा एकंदर माहोल असताना अपर जिल्हाधिकारीसह वरिष्ठ अधिकारी दाखल होऊन कुजगोष्टींना प्रारंभ झाला. मात्र, वृत्तांत जाहीर केला जात नसल्यानं एकूणच प्रकाराविषयी गुढ निर्माण झाले आहे. लॉकडाऊनमध्ये हत्येचा थरार, तलवारी आणि बंदुकीनं एका क्षणात पाडले 5 मृतदेह तहसीलदार सी. आर. राजपूत देखील उपस्थित असून सर्वच प्रस्तुत प्रकाराविषयी मौन बाळगून होते. शहरात कोरोनानं थैमान घातलं आहे. वारंवार बैठका व सूचना होत आहेत. परंतु, तंतोतंत अंमलबजावणी होत नसल्यामुळे अपेक्षित परिणाम होत नाही. गेल्या बैठकीत पश्चिम भागात ही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत काही शैक्षणिक संस्थांच्या इमारती अधिग्रहित करून तिथे क्वारंटाईन कक्ष, इतर सुविधा देण्याचे निर्देश दिले होते. पण प्रत्यक्षात कार्यवाही झाली नाही. LIVE VIDEO: चॉपर दाखवून पळत सुटला, नंतर केले वार; मुंबईत 3 पोलीस जखमी प्रशासनाच्या अशा दुर्लक्षामुळे मालेगावमध्ये नागरिकांचे जीव धोक्यात आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच नियमांचं योग्य पालन करणं महत्त्वाचं आहे. साहेब, कुठून आली एवढी माणुसकी! काळजात घर करेल या फोटोमागची कहाणी संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.