मुंबई, 9 मे : लॉकडाऊनच्या काळात टीव्ही मालिकांचं शूटिंगही ठप्प आहे, आणि आपले आवडते कलाकारही आपापल्या घरात बंद आहेत. पण मिळालेला वेळ कसा सकारात्मकरीत्या घालवायचा हे 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतल्या पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर हिने सांगितलं. News18Lokmat च्या फेसबुक LIVE मध्ये तिने प्रेक्षकांशी थेट संवाद साधला आणि टीव्ही अभिनेत्रीचं पडद्यामागचं आयुष्य उलगडलं.
News18Lokmat लॉकडाऊनच्या काळात सेलेब्रिटींबरोबर LIVE गप्पा मारण्याची संधी प्रेक्षकांना देत आहे. यामध्ये शनिवारी अभिनेत्री अक्षया देवधर हिने प्रेक्षकांशी संवाद साधला. झी टीव्हीवरच्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे अक्षयाची अंजली पाठकबाई घराघरात पोहोचली आहे. या मालिकेचं शूटिंग कोल्हापूरला असतं. ते सध्या बंद असल्याने अक्षया तिच्या पुण्याच्या घरी आहे. वाचकांपैकी काहींनी तिला तिचं सध्याचं रूटीन विचारल्यावर अक्षया म्हणाली, "हातात मिळत असलेला वेळ सकारात्मक कामांसाठी घालवायचा प्रयत्न करते. कंटाळा, नकारात्मक विचार येऊ नयेत यासाठी ते गरजेचं आहे."
अक्षयाचे आई-वडील दोघेही सरकारी सेवेत असल्याने कोरोनाच्या लॉकडाऊन काळातही त्यांना कामासाठी बाहेर पडावं लागतं. "मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली अभिनेत्री आहे. माझे आई-वडील सरकारी सेवेत आहेत. दोघेही अत्यावश्यक सेवेत असल्याने त्यांना या संकटकाळात कामासाठी बाहेर पडावंच लागतं," असं अक्षयानं सांगितलं.
सलमान खान लवकरच चढणार बोहल्यावर? लग्नाबाबत गर्लफ्रेंड युलिया वंतूर म्हणते...
अभियन क्षेत्रात आले नसते तर मी इव्हेंट मॅनेजमेंट केलं असतं किंवा एखादा व्यवसाय सुरू केला असता, असं तिने आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. अक्षयाने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.
वाचन, टीव्ही, सिनेमे बघणे, चित्रकला शिकणे आणि स्वयंपाक करण्यात अक्षया सध्या वेळ घालवते आहे. "आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघते आहे. आईकडून नवनवीन पदार्थ शिकते आहे," असं तिने सांगितलं.
नेहमीच मेकअपशिवाय राहते ही अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहिरात
निर्बंधांचं पालन करा. तरच लवकर आपले व्यवहार सुरू होतील. लॉकडाऊन संपलं तरी घराबाहेर पडताना काळजी घ्यावीच लागणार आहे, याचीही आठवण अक्षयाने करून दिली.
अक्षयाबरोबरचा संवाद पाहण्यासाठी खालच्या VIDEO वर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.