मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Lockdown latest: महाराष्ट्रात कोरोनाच्या उद्रेकानंतर निर्बंध कडक; 15 मुद्द्यांत समजून घ्या लॉकडाउनविषयी सर्व काही

Maharashtra Lockdown latest: महाराष्ट्रात कोरोनाच्या उद्रेकानंतर निर्बंध कडक; 15 मुद्द्यांत समजून घ्या लॉकडाउनविषयी सर्व काही

Maharashtra coronavirus Updates: राज्यातली कोरोना स्थिती चिंताजनक झाल्यामुळे जवळपास निम्म्या महाराष्ट्रात कोरोनाचे कठोर नियम लावावे लागले आहेत. कुठे नाइट कर्फ्यू आहे, तर कुठे कडकडीत लॉक डाउन.

Maharashtra coronavirus Updates: राज्यातली कोरोना स्थिती चिंताजनक झाल्यामुळे जवळपास निम्म्या महाराष्ट्रात कोरोनाचे कठोर नियम लावावे लागले आहेत. कुठे नाइट कर्फ्यू आहे, तर कुठे कडकडीत लॉक डाउन.

Maharashtra coronavirus Updates: राज्यातली कोरोना स्थिती चिंताजनक झाल्यामुळे जवळपास निम्म्या महाराष्ट्रात कोरोनाचे कठोर नियम लावावे लागले आहेत. कुठे नाइट कर्फ्यू आहे, तर कुठे कडकडीत लॉक डाउन.

मुंबई, 12 मार्च: महाराष्ट्रात दररोज वाढणाऱ्या कोरोना (Coronavirus latest updates) रुग्णसंख्येची दखल घेऊन (Maharashtra lockdown news) ही काळजीची बाब असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. 'परिस्थिती अशीच राहिली आणि नागरिकांनी काळजी घेतली नाही, तर राज्याच्या काही भागांत लॉकडाउन (Lockdown latest updates) लागू करावा लागेल,' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray On lockdown) यांनी काल (11 मार्च) दिला होता. त्यानंतर काहीच तासांत केंद्र सरकारने धक्कादायक बाब जाहीर केली आहे. कोरोना रुग्णसंख्या (Corona Patients) सर्वाधिक असलेल्या देशातल्या पहिल्या 10 जिल्ह्यांतले आठ जिल्हे महाराष्ट्रातले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने काल जाहीर केली आहे. काही जिल्हा प्रशासनांनी आणि महापालिकांनी आपापल्या भागात कोरोनाचे निर्बंध कडक केले आहेत. नागपूरसारख्या (Nagpur corona updates) शहरात तर कडक लॉकडाउन जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या परिस्थितीबद्दल आणि लॉकडाउन नियमांबद्दल जाणून घ्या या 15 मुद्द्यांमध्ये

- महाराष्ट्राची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे, असं केंद्र सरकारने गुरुवारी (11 मार्च) म्हटलं आहे. 'आपण अशा परिस्थितीकडे जातो आहोत, की लॉकडाउनसारखे सर्व उपाय पुन्हा लागू करावे लागत आहेत. ही गंभीर बाब आहे,' असं नीती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. काळजी घ्या आणि परिस्थितीवर लक्ष ठेवा. कोरोनाची लागण होण्याचा धोका असलेली मोठी लोकसंख्या अजूनही आहे,' असं त्यांनी म्हटलं.

VIDEO: पुण्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू ,31 मार्चपर्यंत शाळादेखील बंद

- नव्या रुग्णांच्या संख्येत पुणे (Pune lockdown news) आघाडीवर आहे. त्याखालोखाल नागपूर, ठाणे, मुंबई, अमरावती, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद हे जिल्हे देशातल्या सर्वाधिक कोरोनाबाधित जिल्ह्यांच्या यादीत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नीती आयोगातल्या कोविड19विषयीच्या सादरीकरणादरम्यान दिली.

- पुण्यात (Pune corona updates) महापालिकेने नुकतेच नवे कडक निर्बंध लागू केले आहेत. रात्री 11 ते सकाळी 6 संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजता बंद करण्यात येतील शिवाय एकूण ते क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच त्यांची सेवा देऊ शकतात.  मॉल्स, थिएटरसुद्धा 10 नंतर बंद होतील. टपरीवर पाचहून अधिक लोकांना उभं राहून खायला, चहा प्यायला मनाई आहे

- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माहितीनुसार, मुंबईत (Mumbai) नऊ मार्चपर्यंत सील केलेल्या इमारतींची संख्या 229, तर सील केलेल्या मजल्यांची संख्या 2762 होती. दोन मार्च रोजी ही संख्या अनुक्रमे 185 आणि 2237 एवढी होती. म्हणजे सात दिवसांत 23 टक्के वाढ झाली आहे.

- आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 21.25 लाख व्यक्तींचं लसीकरण (Vaccination) झालं आहे.

देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असलेले 10 पैकी 8 जिल्हे फक्त महाराष्ट्रात

- आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका हॉस्टेलवर राहणाऱ्या 44 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं गुरुवारी स्पष्ट झालं आहे. गेल्या महिन्यात त्याच हॉस्टेलमधले 47 विद्यार्थी कोरोनाबाधित झाले होते. या हॉस्टेलमध्ये आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी राहतात. ते हॉस्टेल शहराबाहेर वसलेलं आहे.

- 'महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या वाढीचा ट्रेंड काळजी करण्यासारखा आहे; मात्र तिथे वाढणाऱ्या रुग्णसंख्येत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झालेली नाही,' अशी माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली. 'महाराष्ट्रात कोरोनाविषयक काळजी घेण्याचं प्रमाण कमी आहे, लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र जमत आहेत आणि टेस्ट्स, ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे,' असं ते म्हणाले.

लग्नाला जायचंय म्हणता? आधी हे वाचा; पोलिसांचा मिळू शकतो 'पाहुणचार'

- नागपूरमध्ये कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. 15 ते 21 मार्च दरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात येणार असून, नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत हे लॉकडाऊन लागू केले जाणार आहे.

- अकोला, परभणी, नांदेड जिल्ह्यांतही लॉकडाउनची घोषणा झाली आहे. नंदुकरबार जिल्ह्यात नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे.

-  महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा नव्याने मोठी वाढ झाली आहे. 11 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात महाराष्ट्रात दररोज सरासरी 2415 नवे कोरोनाबाधित सापडत होते. ही सर्वांत कमी संख्या होती. त्यात आता तब्बल 331 टक्क्यांनी वाढ झाली असून, आता दररोज 10 हजार 410 नवे रुग्ण सापडत आहेत.

- महाराष्ट्र हेच कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेलं राज्य ठरलं आहे. राज्यातल्या आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 22 लाख 52 हजार 57 एवढी असून, बुधवारपर्यंत 52 हजार 610 जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांपेक्षा ही संख्या खूप मोठी आहे. गेल्या आठवड्यात देशभरात एक लाख 28 हजार 599 नवे कोरोनाबाधित सापडले. त्यापैकी 57 टक्के महाराष्ट्रातले आहेत.

- जालना जिल्ह्यातल्या आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना कोविड-19 प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस दिल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्या दोघांनाही सौम्य लक्षणं दिसत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

- राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुण्यात रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू असून, नागपुरात जवळपास लॉकडाउनसारखी स्थिती आहे. औरंगाबाद, पालघर, ठाणे, अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांतही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

नागपूरमध्ये लॉकडाऊनची घोषणा, या दिवसात असणार कडक संचारबंदी

- महाराष्ट्रात बुधवारी (10 मार्च) एकाच दिवसातल्या आतापर्यंतच्या सर्वांत जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली. त्या दिवशी 13 हजार 659 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. आठ ऑक्टोबर 2020 रोजी 13 हजार 395 नवे रुग्ण आढळले होते.

- महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती सर्वांत गंभीर असून, गेल्या दोन आठवड्यांपासून परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे.

First published:

Tags: Corona hotspot, Corona updates, Coronavirus, Lockdown, Maharashtra, Mumbai