पुण्यामध्ये कोरोनाची आकडेवारी काहीशी चिंताजनक आहे. देशभरात ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत, त्यापैकी पुणे देखील एक आहे. अशावेळी पुण्यामध्ये काही कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. पुण्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला नसून कडक निर्बंध आणले जाणार आहेत. विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली. नागरिकांनी कोविडच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. शिवाय प्रशासनाचं कडक लक्ष देखील असल्याचं ते म्हणाले.विभागीय आयुक्तांनी अशी माहिती दिली आहे की 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली आहे. शिवाय सर्वेक्षण आणि Contact Tracing देखील सुरू करण्यात येणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.