मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लग्नाला जायचंय म्हणता? आधी हे वाचा; पोलिसांचा मिळू शकतो 'पाहुणचार'

लग्नाला जायचंय म्हणता? आधी हे वाचा; पोलिसांचा मिळू शकतो 'पाहुणचार'

New Corona restrictions Maharashtra: लग्नसोहळ्याविषयी काही बेसिक माहिती काढून मगच घराबाहेर पडणं श्रेयस्कर ठरेल. नाहीतर नुसता लग्नाच्या निमंत्रकांकडून नव्हे तर थेट पोलिसांकडूनही पाहुणचार मिळू शकतो.

New Corona restrictions Maharashtra: लग्नसोहळ्याविषयी काही बेसिक माहिती काढून मगच घराबाहेर पडणं श्रेयस्कर ठरेल. नाहीतर नुसता लग्नाच्या निमंत्रकांकडून नव्हे तर थेट पोलिसांकडूनही पाहुणचार मिळू शकतो.

New Corona restrictions Maharashtra: लग्नसोहळ्याविषयी काही बेसिक माहिती काढून मगच घराबाहेर पडणं श्रेयस्कर ठरेल. नाहीतर नुसता लग्नाच्या निमंत्रकांकडून नव्हे तर थेट पोलिसांकडूनही पाहुणचार मिळू शकतो.

मुंबई, 11 मार्च: लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. पण कुठल्याही नातेवाईकांच्या किंवा मित्र-मंडळींच्या लग्नाचं आमंत्रण आलं असेल आणि जाण्याचा विचार करत असाल तर आधी हे वाचा. या लग्नसोहळ्याविषयी काही बेसिक माहिती काढून मगच घराबाहेर पडणं श्रेयस्कर ठरेल. नाहीतर नुसता लग्नाच्या निमंत्रकांकडून नव्हे तर थेट पोलिसांकडूनही पाहुणचार मिळू शकतो. लग्न सोहळ्यांमध्ये कोरोना नियम न पाळणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत. नुसते आदेश नाहीत, तर राज्यातल्या दोन ठिकाणच्या बातम्या आम्ही सांगतो, जिथे पोलिसांनी स्वतः जाऊन वधू-वरांसकट उपस्थित पाहुणे मंडळींवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे पोलिसी पाहुणचार म्हणजे तुरुंगाची हवा खायची नसेल तर तुम्हाला निमंत्रण देणाऱ्यांनी आणखी किती लोकांना लग्नाला बोलावलं आहे आणि नियमांत बसेल असा सोहळा आयोजित केलेला आहे ना याची खातरजमा करून मगच लग्नाला जाण्याची तयारी सुरू करा.

डिसेंबरपर्यंत आटोक्यात येतो असं वाटत असलेल्या (Coronavirus) ने पुन्हा डोकं काढलं आहे आणि आता तर कहर केला आहे. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना पुन्हा एकदा कडक लॉकडाउनची टांगती तलवान डोक्यावर आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात निर्बंध कडक करण्यात आले आहेत. लग्नसोहळ्यांना कमीत कमी उपस्थितीचा नियम बहुतेक सगळ्याच शहरांमध्ये आहे. ग्रामीण भागातही सोहळ्याला किती माणसं उपस्थित राहतील याची कल्पना प्रशासनाला देणं बंधनकारक आहे. असं असलं तरी लोक मात्र कोरोनाची बंधनं झुकारून लग्न सोहळे दणक्यात साजरे करत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे शहरांमध्ये  आणि उपनगरांमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीतच सोहळा आयोजित करण्याचं बंधन आहे. पण नागरिक हे गंभीरपणे घेत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेच स्थानिक प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असलेले 10 पैकी 8 जिल्हे फक्त महाराष्ट्रात

कोरोना नियम न पाळणाऱ्यांविरोधात आता थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळणे म्हणजे गर्दी केली तर आयोजकांबरोबरच गर्दीतल्या नागरिकांवरही आता गुन्हा दाखल होतो आहे. हाच नियम लग्नसोहळ्यांसाठी लागू आहे. त्यामुळे परवानगी असलेल्यांपेक्षा अधिक संख्येने माणसं जमा झाली तर फक्त हॉलचालक, लग्नस्थळाचे मालक, आयोजक, लग्नघरातली मंडळी, निमंत्रक यांच्यावरच गुन्हे दाखल होणार असं नाही तर यांच्याबरोबर उपस्थित पाहुण्यांवरही कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांत गुन्हा नोंदवला जाणार आहे.

कल्याणमध्ये जमले 700 लोक

एकीकडे कल्याण-डोंबिवलीत रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला असताना नागरिक शिस्त पाळत नसल्याचं चित्र आहे. बुधवारी म्हणजे ज्या दिवशी रुग्णसंख्या दुपटीने वाढली आणि रात्रीचा कर्फ्यू लागू केला त्याच दिवशी कल्याण पूर्वेतल्या 60 फुटी रस्त्याला गॅस कंपनीशेजारी एका लग्न सोहळ्याला 700 लोक जमले होते.

कल्याण-डोंबिवलीत 24 तासांत दुप्पट रुग्णवाढ; नाइट कर्फ्यूसह कडक निर्बंध लागू

मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासलेला दिसत होता. त्यामुळे पोलिसांनी या सोहळ्यासाठी जमलेल्या 700 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

लग्न समारंभाची परवानगी न घेणं भोवलं

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील  जबुलढम येथे घाईट आणि पाटील परिवारातला लगसोहळा सुरू होता. त्या लग्नाची कुठलीच परवानगी घेण्यात आली नव्हती आणि लग्नात 100 ते 150 जणांची उपस्तिथी होती. ग्रामीण पोलिसांना खबर मिळताच या  लग्नाला आलेल्या पाहुण्यांसकट आयोजकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मास्क न वापरणे, सोशल डिस्टनसिंग न पाळणे, सॅनिटायझर न वापरणे  यासाठी गुन्हा नोंदवण्यात आला. वधू-वरांसह 104 जणांवर मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोठी बातमी! नागपूरमध्ये लॉकडाऊनची घोषणा, या दिवसात असणार कडक संचारबंदी

त्यामुळे तुम्ही शहरांतल्या किंवा गावातल्या कुठल्याही लग्नसोहळ्याला जायचा विचार करत असाल तर किमान माहिती घ्या आणि शक्यतो सोहळे टाळाच.

First published:

Tags: Coronavirus, Covid19, Lockdown, Police action, Social distancing, Wedding rules