Home /News /maharashtra /

सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात नव्हे तर या राज्यात झाल्यात सर्वाधिक Corona चाचण्या

सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात नव्हे तर या राज्यात झाल्यात सर्वाधिक Corona चाचण्या

जागतिक आरोग्य संघटनाही त्यासाठी अनेक देशांना मदत करत असून हे प्रचंड खर्चाचं आणि मनुष्यबळ लागणारं काम असल्याने त्याचं काटेकोर नियोजन करावं लागणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनाही त्यासाठी अनेक देशांना मदत करत असून हे प्रचंड खर्चाचं आणि मनुष्यबळ लागणारं काम असल्याने त्याचं काटेकोर नियोजन करावं लागणार आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा दावा आहे की, राज्यात कोरोना चाचण्यांचं प्रमाण सर्वात जास्त असल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडादेखील वाढतो आहे. पण आता दुसऱ्याच एका राज्याने चाचण्यांच्या संख्येत वाढ केली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्या राज्यात अजून चाचण्या कमीच होत आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 8 मे : देशभरात Coronavirus चा आलेख तिसऱ्या लॉकडाऊनमध्येही वाढतोच आहे. महाराष्ट्रातला आकडा सर्वात वेगाने वाढतो आहे. त्यातही सर्वाधिक कोरोनाग्रस्त महानगरी मुंबईत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा दावा आहे की, राज्यात कोरोना चाचण्यांचं प्रमाण सर्वात जास्त असल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडादेखील वाढतो आहे. पण आता या दाव्याला छेद देत तामिळनाडूने चाचण्यांच्या संख्येत वाढ केली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांपेक्षा तामिळनाडूत अधिक चाचण्या झाल्या आहेत. तरी या राज्यात कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रापेक्षा बरेच कमी आहेत. आतापर्यंत देशभरात या विषाणूची लागण 56342 लोकांना झाली आहे. देशभरात आतापर्यंक 1886 कोरोनाबळी गेले आहेत. त्यातही महाराष्ट्राचा आकडा सर्वाधिक आहे. राज्यात काल रात्रीपर्यंत 694 कोरोना मृत्यूंची नोंद झाली होती. तामिळनाडूत आतापर्यंत फक्त 37 मृत्यूंची नोंद झाली आहे. मोठी बातमी : BMC आयुक्तपदावरून प्रवीण परदेशी यांना हटवलं, 'या' अधिकाऱ्याकडे धुरा महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वांत जास्त आहे. 18000 च्या वर हा आकडा गेलेला आहे. तामिळनाडूत मात्र गेल्या चार दिवसांपासून कोरोनारुग्णांचा आकडा वाढतो आहे. कारण या राज्याने चाचण्या करण्याचं प्रमाण वाढवलं आहे. किती चाचण्या? गुरुवार संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार तामिळनाडूत  202436 नमुन्यांची COVID-19 चाचणी झाली. तर महाराष्ट्रात हाच आकडा 202105 आहे. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर तामिळनाडूची लोकसंख्या फक्त 65 टक्के आहे. महाराष्ट्रात या दक्षिणी राज्याच्या तुलनेत तिप्पट रुग्ण आढळले आहेत. दहा दिवसांपूर्वी तामिळनाडूने कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे तिथे चाचण्या वाढल्या आहेत. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या मानाने इथे अजूनही अधिक प्रमाणात चाचण्यांची आवश्यकता आहे. अन्य बातम्या वृद्ध आईला मुलांनी जिवंतपणीच केलं दफन; लोकांनी 3 दिवसांनी कबर खणली आणि... कोरोना संशयित रुग्णाबाबत ठाण्यातील रस्त्यावर घडली धक्कादायक घटना चेष्टाच झाली राव! वाऱ्याने रौद्र रुप घेताच पूल झुलायला लागला, पाहा VIDEO लॉकडाऊन नसतं तर उद्भवली असती अशी भयावह परिस्थिती, रिपोर्ट आला समोर
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या