बिजिंग, 08 मे : सध्या सोशल मीडियावर एक ब्रिज हवेमुळं हलत असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये स्पष्टपणे दिसतं की, कशा प्रकारे वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे ब्रिज हादरत आहे. सध्या हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद केल्याची माहिती मिळत आहे. शाघाइस्टने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या गुआंगडोंग प्रांतातील हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, चीनमधील हुमेन ब्रिजवर गाड्या जात आहेत. त्याचवेळी वेगाचा वारा येतो आणि ब्रिज हादरायला सुरुवात होते. ब्रिजवरच्या गाड्याही इकडे तिकडे सरकायला लागतात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच गुआंगडोंग पोलिसांनी काही वेळासाठी ब्रिज बंद करण्यात आला आहे. पर्ल नदीवर असलेला हा ब्हिज ग्वांगझू आणि गुआंगडोंग शहरांना जोडतो. या ब्रिजचा व्हिडिओ युट्यूबवर शेअर करण्यात आला आहे.
अनेक युजर्सनी हे भीतीदायक असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने कमेंट करताना म्हटलं की, मला हे पाहून मोशन सिकनेस होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर ब्रिजची तपासणी केली जात आहे. हे वाचा : आई शप्पथ हे भन्नाट आहे! लॉकडाऊनमध्ये कॅरम खेळण्याची ही पद्धत तुम्ही पाहिली का? ब्रिज तुटला की इतर काही समस्या निर्माण झाल्या आहेत याचा शोध घेतला जात आहे. ब्रिज व्यवस्थित असून तो वेगाच्या वाऱ्यामुळे हालण्यास सुरुवात झाली होती असंही सांगितलं जात आहे. वाहतूक सुरू करण्याआधी लोकांना विश्वास देण्यात आला आहे की भीतीचं कारण नाही. हा ब्रिज थोडा लवचिक करण्यात आला होता. हे वाचा : अबब! भलामोठा अजगर झाला शिकार, 15 फूट लांब किंग कोब्रानं बघताच क्षणी गिळलं