जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मोठी बातमी : BMC आयुक्तपदावरून प्रवीण परदेशी यांना हटवलं, हा अधिकारी सांभाळणार धुरा

मोठी बातमी : BMC आयुक्तपदावरून प्रवीण परदेशी यांना हटवलं, हा अधिकारी सांभाळणार धुरा

जागतिक वारसा दिनादिवशी (World Heritage Day) मुंबई महापालिकेचे मुख्यालय

जागतिक वारसा दिनादिवशी (World Heritage Day) मुंबई महापालिकेचे मुख्यालय

प्रवीण परदेशी यांच्याकडे आता नगरविकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

राधिका रामस्वामी, मुंबई, 8 मे : राजधानी मुंबईतील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर मुंबई महानगरपालिकेत मोठी उलथापालथ करण्यात आली आहे. मनपाच्या आयुक्तपदावरून प्रवीण परदेशी यांना हटवण्यात आलं असून त्यांच्या जागी इक्बाल चहल हे आयुक्तपदाची धुरा सांभाळतील. भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या प्रवीण परदेशी यांच्या बदलीबाबत राज्यातील सत्तांतरानंतर चर्चा सुरू होती. मात्र आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी यांच्याकडे आता नगरविकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी असणार आहे. तर मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांचीही बदली करण्यात आली असून मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी ठाणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त असलेल्या संजीव जैस्वाल यांची नेमणूक करण्यात आली आहे. माजी मेट्रो रेल्वे प्रधिकरणाच्या आयुक्त आश्विनी भिडे यांचीदेखील मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना अशा प्रकारे वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्यांमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात