मराठी बातम्या /बातम्या /विदेश /वृद्ध आईला मुलांनी जिवंतपणीच केलं दफन; लोकांनी 3 दिवसांनी कबर खणली आणि...

वृद्ध आईला मुलांनी जिवंतपणीच केलं दफन; लोकांनी 3 दिवसांनी कबर खणली आणि...

 वृद्ध आईला मुलाने जिवंतपणीच दफन केलं होतं. त्यानंतर तीन दिवसांनी महिलेला कबरीतून बाहेर काढण्यात आलं.

वृद्ध आईला मुलाने जिवंतपणीच दफन केलं होतं. त्यानंतर तीन दिवसांनी महिलेला कबरीतून बाहेर काढण्यात आलं.

वृद्ध आईला मुलाने जिवंतपणीच दफन केलं होतं. त्यानंतर तीन दिवसांनी महिलेला कबरीतून बाहेर काढण्यात आलं.

बीजिंग, 08 मे : चीनच्या उत्तर भागात एका व्यक्तीने त्याच्या आईला जिवंत गाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रिकाम्या कबरीमध्ये वृद्ध आईला मुलाने जिवंतपणीच दफन केलं होतं. त्यानंतर तीन दिवसांनी महिलेला कबरीतून बाहेर काढण्यात आलं. तेव्हा महिला घाबरलेल्या अवस्थेत होती.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपीच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार आरोपी आईला घेऊन 2 मे ला गेला होता. त्यानंतर तीन दिवस झाले तरी महिला परत न आल्यानं याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तेव्हा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.

चीनच्या शाक्सी प्रांतात ही घटना घडली आहे. जिंगबियान काउंटी इथं 58 वर्षीय मा नावाच्या पुरुषाने त्याच्या आईला जिवंतपणीच कबरीमध्ये दफन केलं होतं. 79 वर्षीय आईला लोकांनी कबरीतून बाहेर काढल्यानंतर ती घाबरलेली होती. तसंच मदतीसाठी विनंती करत होती.

हे वाचा : चेष्टाच झाली राव! वाऱ्याने रौद्र रुप घेताच पूल झुलायला लागला, पाहा VIDEO

वृद्ध महिलेला पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ती नेहमीच अंथरुणावर पडून असायची. आजारी आईची सेवा करावी लागते यामुळे वैतागलेल्या मुलानं हे अमानवी कृत्य केलं. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं असून प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

हे वाचा : बाप रे! बेसिनमध्ये भांडी घासताना निघाला जगातला सर्वात विषारी साप, पाहा PHOTO

First published:
top videos

    Tags: China