Home /News /maharashtra /

कोरोना संशयित रुग्णाबाबत ठाण्यातील रस्त्यावर घडली धक्कादायक घटना

कोरोना संशयित रुग्णाबाबत ठाण्यातील रस्त्यावर घडली धक्कादायक घटना

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

रस्त्यावर बसल्यानंतर ही आजारी व्यक्ती मदतीकरता लोकांना हाक देवू लागली. हा सर्व धक्कादायक प्रकार तब्बल एक तास सुरू होता.

ठाणे, 8 मे : कोरोनाचं थैमान सुरू असताना ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाची लक्षण असलेली व्यक्ती तब्बल तास भर भररस्त्यात व्हिवळत पडली होती. हा प्रकार ठाण्यातील वाडीया हॉस्पिटल समोर घडला आहे. गोकुळनगर येथे राहणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीला अस्वस्थ वाटत असल्याने ती व्यक्ती ठाण्यातील वाडीया हॉस्पिटल येथे आली. मात्र वाडीया हॉस्पिटलमधील ओपीडी बंद झाल्याने आता जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला. त्यात त्या व्यक्तीची तब्येत खालावत चालल्याने ती व्यक्ती रस्तावरच बसली. रस्त्यावर बसल्यानंतर ही आजारी व्यक्ती मदतीकरता लोकांना हाक देवू लागली. हा सर्व धक्कादायक प्रकार तब्बल एक तास सुरू होता. शिवाय त्या व्यक्तीकरता एक तास अॅम्ब्युलन्सची सुविधादेखील उपलब्ध होवू शकली नाही. या सर्व प्रकाराची माहिती स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे यांना कळवली असता त्यांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला घटनेची माहिती दिली आणि काही वेळातच आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी अॅम्ब्युलन्स घेवून पोहोचले. हेही वाचा - औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर! SRP चे 72 जवान पॉझिटिव्ह, हॉटस्पॉटमध्ये केली ड्युटी संबंधित व्यक्तीला नंतर कळवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र ती व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आहे की नाही ? त्यानुसार त्या व्यक्तीला हॉस्पिटमध्ये शिफ्ट केलं जाईल, असं निश्चित करण्यात आलं. या प्रक्रियेला देखील वेळ गेला. शेवटी त्या व्यक्तीला कळवा हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले की नाही? किंवा त्या व्यक्तीला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले? याबाबत मात्र माहिती उपलब्ध होवू शकली नाही. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Thane news

पुढील बातम्या