Home /News /maharashtra /

HSC-SSC Result 2020 : निकाल आज जाहीर होणार नाहीत, 20 दिवस करावी लागणार प्रतीक्षा

HSC-SSC Result 2020 : निकाल आज जाहीर होणार नाहीत, 20 दिवस करावी लागणार प्रतीक्षा

जुलै महिन्यापर्यंत सर्व प्रकिया पूर्ण करून निकाल जाहीर केले जातील असं सांगण्यात आलं आहे.

    मुंबई, 10 जून : इयत्ता 12 वीचा (Maharashtra HSC Result 2020) निकाल बुधवारी लागणार अशी चर्चा होती मात्र हा निकाल 10 जूनला लागणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं निकाल उशिरा लागू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उच्च न्यायालयानं महाराष्ट्र बोर्डाचे इयत्ता 10 वी आणि 12 वीचे निकाल 10 जूनपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. 12 वीच्या (Maharashtra HSC Result 2020) उत्तरपत्रिकांचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं हे निकाल उशिराला जाहीर केले जातील असे संकेत महाराष्ट्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, एमएसबीएसएचएसईनं निकालाची (Maharashtra HSC Result 2020) कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केली नाही. जुलै महिन्यापर्यंत सर्व प्रकिया पूर्ण करून निकाल जाहीर केले जातील अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. हे वाचा-'वडिलांनी वर्षभराच्या पगारातू मला अमेरिकेचं तिकीट काढून दिलं ' कोरोना व्हायरसमुळे टप्प्यांमध्ये देशात मार्च ते 31 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. यामुळे दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपरही रद्द करण्यात आला होता. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तपत्रिकांचं काम अद्यापही सुरू असल्यानं निकाल रखडल्याचे संकेत मिळाले आहेत. कोरोनाचा महाराष्ट्रातील संसर्ग लक्षात घेता शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखा जुलैपर्यंत जाहीर होतील असं सांगण्यात येत आहे.तब्बल 33 कोटी विद्यार्थी शाळा केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत. पालक व शिक्षकांसोबत झालेल्या चर्चेनंतर एचआरडी मंत्री रमेश निशंक पोखरिया यांनी शाळा आणि महाविद्यालये ऑगस्टनंतर पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यातही 15 ऑगस्टनंतर शाळा व महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय 15 ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचा निकाल देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. हे वाचा-वडिलांनी घर विकून उभे केले पैसे, पहिल्याच प्रयत्नात मुलगा झाला IAS हे वाचा-Success Story: चहा विकणाऱ्याचा मुलगा झाला IAS अधिकारी संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, HSC, SSC, Ssc board, Ssc-result

    पुढील बातम्या