इंदूर, 21 जून : मुलाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडील जीवाचं रान करतात आणि त्याचं चीज इंदूरच्या प्रदीप सिंग यांनी केलं. प्रदीप यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी दागदागिने आणि घरही विकावं लागलं याची जाणीव ठेवून प्रदीप यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC पास होऊन IAS होण्याचं स्वप्न साकार केलं आहे. 2018 रोजी प्रदीप सिंग यांनी 93 वा क्रमांक मिळवून आपल्या आई-वडिलांचं नाव उज्ज्वल केलं. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता जाणून घेऊया.
प्रदीप मूळचे बिहारचे असून त्यांनी दिल्लीतून UPSCची तयारी केली आहे. IAS होण्याचं स्वप्न त्यांनी अगदी लहान असल्यापासून पाहिलं होतं. महिला सशक्तिकरण, महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांना काम करायचं होतं. मनात IAS व्हायचा निश्चय पक्का होता आणि त्या दिशेनं पावलं उचलण्यास सुरुवात देखील झाली.
हे वाचा-Success Story: चहा विकणाऱ्याचा मुलगा झाला IAS अधिकारी
यूपीएससीमध्ये 93 वा क्रमांक मिळविणारे प्रदीप दिल्लीत राहिले आणि स्पर्धा परीक्षेसाठी तयारी केली. गरिबीत, त्यांच्या पालकांनी शिकवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. प्रदीपच्या आई-वडिलांनी त्यांच्या गरजा भागवून त्यांना शिकवले. प्रदीपचे वडील 1992 मध्ये मध्य प्रदेशात आले आणि येथे त्यांनी पेट्रोल पंपावर काम केले.
प्रदीप यांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या UPSCच्या तयारीसाठी दिल्ली पाठविण्यासाठी घर विकले. तेव्हापासून हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत आहे. अभ्यास चालू ठेवण्यासाठी आईने तिचे दागिने देखील विकले. दिल्लीला जात असताना प्रदीपने आपल्या आईची खात्री करुन दिली की त्यांची निवड नक्कीच होईल आणि तसेही झाले. इंदूर डीएव्हीव्हीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर प्रदीप दिल्लीला गेला. जिद्द, एकाग्रता आणि मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास झाले.
हेे वाचा-12 वी नापास झाल्यावर प्रियसीची मागितली साथ, जिद्दीच्या जोरावर झाले IPS अधिकारी
संपादन- क्रांती कानेटकर