सुरत, 21 जून : आई-वडिलांनी नोकरी गमवणं हे मुलाच्या शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टीनं किती समस्यांचा सामना करणारं असेल याचा नुसता विचार केलेला बरा. गुजरातमधील सूरतमध्ये सफीन हसन यांच्या संघर्षाची कथा आज आपण पाहणार आहोत. 2017 साली UPSCमध्ये दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 570 क्रमांक मिळवून IAS अधिकारी झाले. त्यांना कोणता आणि कसा संघर्ष करावा लागला? त्यांनी धीर न सोडता कसा यशाचा मार्ग गाठला याची यशोगाथा आज पाहाणार आहोत.
सफिन हा मध्यमवर्गीय कुटुंबातील होता. त्याचे आई-वडील सूरतमधील डायमंड युनिटमध्ये काम करत होते. अचानक त्यांची नोकरी जाते आणि आर्थिक चणचण जाणवायला लागली होती. त्यामुळे आई घरोघरी पोळी आणि वडील चहा विकायचे. त्यातून उदरनिर्वाह सुरू होता.
परिस्थितीशी दोन हात करत सफीन हसन झाले IAS
प्रत्येक छोट्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सफिन यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला.साफिन यांनी तेव्हाच UPSC देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी UPSC ची तयारी करण्यासाठी सुरुवात केली.
दिल्लीमध्ये 2 वर्ष तयारी केली पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाली मात्र डगमगून न जाता त्यांनी पुन्हा तयारी करण्यास सुरुवात केली. पहिल्या परीक्षेनंतर त्यांचा अपघात झाला मात्र डगमगून न जाता त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि यशस्वी झाले.
हे वाचा-शेतकऱ्याच्या मुलाने भाजी विकून केला अभ्यास तरी झाला दहावीचा टॉपर
हे वाचा-वकिली सोडून UPSC ची केली तयारी, दुसऱ्याच प्रयत्नात मिळवला 8वा क्रमांक
हे वाचा-12 वी नापास झाल्यावर प्रियसीची मागितली साथ, जिद्दीच्या जोरावर झाले IPS अधिकारी
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Fathers day 2020, IAS