विद्यार्थिदशेतल्या दोन महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये 10वी आणि 12वी चा समावेश होतो. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामनंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट परीक्षा. ही परीक्षा HSC ची किंवा 12वीची परीक्षा म्हणून ओळखली जाते. एसएससीच्या परीक्षेसारखीच HSC ची परीक्षाही भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमध्ये सारख्याच पद्धतीने घेतली जाते. तिन्ही देशांमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांद्वारे ही परीक्षा घेतली जाते.