मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शरद पवार हे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील? भाजपच्या टीकेला गृहमंत्र्यांचं रोखठोक उत्तर

शरद पवार हे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील? भाजपच्या टीकेला गृहमंत्र्यांचं रोखठोक उत्तर

विरोधकांनी मुंगेरीलालचे स्वप्न पाहत राहावं...

विरोधकांनी मुंगेरीलालचे स्वप्न पाहत राहावं...

विरोधकांनी मुंगेरीलालचे स्वप्न पाहत राहावं...

नागपूर, 28 नोव्हेंबर: शरद पवार (Sharad Pawar) तेव्हा पुतण्याला नव्हे, सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) मुख्यमंत्री करतील' असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला होता. त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पलटवार केला आहे.

चंद्रकांत पाटील यांची राजकीय उंची काय? काही कर्तुत्त्व नसताना, उंची नसताना ते हे बोलतात. त्यांनी आपली उंची काय ते आधी पाहावं. हे सर्वांनाच माहिती आहे. ते मोठ्या मोठ्या नेत्यांबाबत असंच काही बोलून आपली उंची वाढवत राहतात, अशी सणसणीत टीका अनिल देशमुख यांनी केली.

हेही नाचा...अकाउंटमध्ये पैसे टाक, नाहीतर तुझा सेक्स व्हिडिओ व्हायरल करतो; शाळकरी विद्यार्थ्याला धमकी

गृहमंत्री म्हणाले, कोरोना आणि विविध आघाड्यांवर आमच्या सरकारने चांगलं काम केलं आहे. हीच आमची अचिव्हमेंट आहे. आमचे सरकार पाच वर्षे चालेल. विरोधकांनी मुंगेरीलालचे स्वप्न पाहत राहावं, असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले आहेत, त्यावर बोलताना गृहमंत्री यांनी सांगितलं की, अन्वय नाईक प्रकरणात आमचा तपास सुरु आहे. कोर्टाची परवानगी घेऊन आम्ही तपास करत आहे. अन्वय नाईक यांची केस चुकीच्या पद्धतीनं मागच्या सरकारने दाबली होती. लवकरात लवकर याची चार्जशीट दाखल करणार आणि कारवाई करणार आहे. त्यामुळे आमची कारवाई योग्य आहे. कंगना रणौतबाबत बीएमसीचा निर्णय आहे. त्याच्याशी राज्य सरकारचाही संबंध नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मी माफी मागण्याचा प्रश्नंच नाही, असंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

दैनिक 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगल्या प्रकारे आपली भूमिका मांडली. विरोधी पक्षाला आपलं काम करायचं आहे. कोरोनाबात राज्य सरकारने चांगलं काम केलं. विरोधी पक्षाने कोरोनावर काम करताना सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली असल्याचं गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

नेमकं काय म्हटले होते चंद्रकांत पाटील?

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवारी इस्लामपूरमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले होतं. पवार काकांबद्दल गोडवे गाणाऱ्या अजित पाटील गतवर्षी तीन दिवसांसाठी का होईना काकांना सोडलं होतं. हा इतिहास नाही का? आगामी काळात कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर शरद पवार पुतण्याला नव्हे, तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला होता. तसेच मंत्री जयंत पाटील यांनाही पुढील विधानसभा निवडणुकीत पाहूच, असे आव्हान त्यांनी दिलं आहे.

हेही वाचा...महाराष्ट्राच्या मंत्रालयात अनेक झारीतले शुक्राचार्य, छगन भुजबळ यांचं मोठं विधान

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'ओबीसी आरक्षणावरून केलेल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. आरक्षणाबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांना फारशी माहिती नसल्याचे मी बोललो होतो. मात्र, यावरून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी माझ्यावर पलटवार केला. उपमुख्यमंत्री अजित पवारही माझ्याबद्दल बोलले. पवार काकांचे गोडवे गाणाऱ्या अजितदादांनी गतवर्षी तीन दिवसांसाठी का होईना काकांना सोडले होते, हा इतिहास नाही का? आगामी काळात कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर शरद पवार पुतण्याला नव्हे, तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील, असा टोला त्यांनी लगावला होता.

First published:

Tags: Maharashtra, Sharad pawar, Supriya sule