मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वृत्तपत्रांचं आणि अत्यावश्यक सामानाचं घरोघरी वितरण : सरकारने बदलला नियम

वृत्तपत्रांचं आणि अत्यावश्यक सामानाचं घरोघरी वितरण : सरकारने बदलला नियम

घरोघरी होणाऱ्या वृत्तपत्र वितरणावर निर्बंध घालण्यात आले होते. तो निर्णय आता मागे घेत राज्य सरकारने होम डिलिव्हरी आणि वृत्तपत्र यांच्याविषयी नवी नियमावली जारी केली आहे.

घरोघरी होणाऱ्या वृत्तपत्र वितरणावर निर्बंध घालण्यात आले होते. तो निर्णय आता मागे घेत राज्य सरकारने होम डिलिव्हरी आणि वृत्तपत्र यांच्याविषयी नवी नियमावली जारी केली आहे.

घरोघरी होणाऱ्या वृत्तपत्र वितरणावर निर्बंध घालण्यात आले होते. तो निर्णय आता मागे घेत राज्य सरकारने होम डिलिव्हरी आणि वृत्तपत्र यांच्याविषयी नवी नियमावली जारी केली आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

मुंबई, 21 एप्रिल : महाराष्ट्रात Coronavirus चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाकरे सरकारने वृत्तपत्रांचं घरोघरी जाऊन होणारं वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला होता. वृत्तपत्र छपाईवर निर्बंध नव्हते, पण त्याच्या घरोघरी होणाऱ्या वितरणावर निर्बंध घालण्यात आले होते. तो निर्णय आता मागे घेत सरकारने होम डिलिव्हरी आणि वृत्तपत्र यांच्याविषयी नवी नियमावली जारी केली आहे.

केंद्र सरकारने 14 तारखेनंतर 3 मेपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन वाढवला. त्याअगोदरच महाराष्ट्रात राज्य सरकारने 30 तारखेपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम असतील आणि धोका नसलेल्या भागात हळूहळू उद्योग सुरू करण्यात येतील असं सांगितलं होतं. त्यासाठी 20 तारखेपासून काही उद्योगांना परवानगीही देण्यात आली. पण यामधून मुद्रित माध्यमांना सुरुवातीला वगळण्यात आलं होतं. तो निर्णय थोडा बदलून वृत्तपत्र छपाईला परवानगी देण्यात आली. पण वृत्तपत्रांचं घरोघरी होणारं वितरण शासनाने बंदच ठेवलं. वृत्तपत्र स्टॉलवर उपलब्ध असेल आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून स्टॉलवरून ते घ्यावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचवलं. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

वाचा - पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी बातमी, 'या' वेळेतच सुरू राहणार पेट्रोल पंप

आता वृत्तपत्रांचं घरोघरी होणाऱ्या वितरणाविषयीचा नियम सरकारने पुन्हा एकदा बदलला आहे. मुंबई आणि पुणे महानगर परिसर वगळता इतरत्र जिथे Covid-19 चा प्रादुर्भाव आटोक्यात आहे अशा ठिकाणी घरोघरी वृत्तपत्र वितरणाला परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्र containment zones वगळता इतर ठिकाणी वृत्तपत्रांचं वितरण आता सुरू केलं जाऊ शकतं.

वृत्तपत्रांव्यतिरिक्त होम डिलिव्हरी देणाऱ्या इतर अत्यावश्यक सेवांवरची बंधनसुद्धा थोडी सैल करण्यात आली आहेत. पण होम डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीने मास्क वापरणं आवश्यक आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच हे काम करणं बंधनकारक असेल असं नवा सरकारी आदेश सांगतो.

अन्य बातम्या

Lockdown मधलं सुंदर पुणं आणि हटवादी पुणेकर - पाहायलाच हवेत असे PHOTO

सावधान! Lockdown नंतर ही काळजी घेतली नाही तर होऊ शकतो कोरोनाचा उद्रेक

आता पडा घराबाहेर! दोघं फिरायला गेले आणि एकमेकांनाच बदडावं लागलं, पाहा VIDEO

First published:

Tags: Coronavirus, Uddhav Thackeray (Politician)