लॉकडाऊनमुळे कधी नव्हे ती शहरं चिडीचूप झाली आहेत. त्यामुळे भर रस्त्यातही निसर्ग असा भरभरून दान देतो आहे.
रस्त्यावर अजिबात वर्दळ नसल्याने या फुलांच्या पायघड्या शाबूत राहिल्या. कधी नव्हे ते निसर्गाच्या या रंगीबेरंगी अस्तित्वाची जाणीव शहरी पुणेकरांना मिळते आहे.
मध्य वस्तीत कोरोनाव्हायरसचा फैलाव जास्त झाल्याने पोलिसांनी निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.
एका बाजूला मेहेंदळे गॅरेज ते CDSS रस्त्याचं हे चित्र असताना दुसरीकडे काही नाठाळ पुणेकर मात्र अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडत आहेत.
अशा रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पुणे पोलिसांनी रस्त्यातच बसायची शिक्षा दिली. लॉकडाऊन सुरू असताना मी मूर्खासारखं बाहेर पडलो. परत मी असं वागणार नाही, अशी प्रतिज्ञा रस्त्यात बसायला सांगून पोलिसांनी दिली.
पुणे तिथे काय उणे असं उगाच म्हटलं जात नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन आहे. पुण्यातकितीही परिस्थिती गंभीर असली तरी पुणेकर असे रांगा लावतच आहेत.ही जास्त रुग्ण आढळल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. पण, कितीही परिस्थिती गंभीर असली तरी पुणेकर खंबीर असतात, हे आज दिसून आलं. (फोटो सौजन्य - वैभव सोनवणे)
रविवार म्हटला की, हमखास चिकन, मटण आणि मासे खाण्याचा हक्काच दिवस. आठवड्यातील इतर दिवशी जी मजा येत नाही, ती मजा याच दिवशी जास्त येते.
पण, लॉकडाउनमुळे पुणेकरांसह सर्वच जण गेल्या महिन्याभरापासून घरातच अडकून आहे. पण तरीही रविवाराचा मांसाहारचा खाडा वाया जाणार नाही, याची पूर्ण खबरदारी पुणेकरांनी घेतली आहे.
म्हणूनच पुण्यात आज रविवारचा दिवस साजरा करण्यासाठी खवय्यांनी चिकन आणि मटण च्या दुकानासमोर अक्षरश: रांगा लावल्यात.
लॉकडाउनमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळा अशी वारंवार सूचना दिली जाते, पण तरीही जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पुणेकरांनी सोशल डिस्टन्सिंगची पार वाट लावून टाकली.
लॉकडाऊनचे नियम पाळणारे, शिस्तप्रिय पुणेकर आणि त्यांना भरभरून देणारा निसर्ग आणि इथे तास तास रांगा लावणारे हटवादी पुणेकर अशी विरुद्ध चित्र शहरात दिसत आहेत.