• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'रोहितला काम करू द्या, तुम्ही गप्प गुमान बसा' अजितदादांनी भाजप नेत्याला फटकारले

'रोहितला काम करू द्या, तुम्ही गप्प गुमान बसा' अजितदादांनी भाजप नेत्याला फटकारले

 'फडणवीस यांनी जामखेड येथे येऊन पिण्याच्या पाण्याची योजना तत्त्वतः मंजूर केल्याचे सांगितले होते. मात्र ही योजना अद्याप पूर्ण झाली नाही'

'फडणवीस यांनी जामखेड येथे येऊन पिण्याच्या पाण्याची योजना तत्त्वतः मंजूर केल्याचे सांगितले होते. मात्र ही योजना अद्याप पूर्ण झाली नाही'

'फडणवीस यांनी जामखेड येथे येऊन पिण्याच्या पाण्याची योजना तत्त्वतः मंजूर केल्याचे सांगितले होते. मात्र ही योजना अद्याप पूर्ण झाली नाही'

 • Share this:
  अहमदनगर, 13 नोव्हेंबर : अहमदनगर (ahmednagar)  जिल्ह्यातल्या आमदार रोहित पवार (rohit pawar) यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत आणि जामखेड तालुक्यात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी हजेरी लावली. यावेळी अजितदादांनी रोहित पवारांच्या कामाचं कौतुक करत  'रोहित पवार काम करतोय त्याला करू द्या आणि तुम्ही गप्प गुमान बसा' असा सल्ला वजा टोलाच अजितदादांनी भाजपचे नेते राम शिंदे (ram shinde) यांना लगावला. अहमदनगर जिल्ह्यातल्या आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत आणि जामखेड तालुक्यात विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. Twins Island : या गावात सर्वत्र दिसतात जुळी मुलं, माणसं; रहस्यामागील कारण काय? 'फडणवीस यांनी जामखेड येथे येऊन पिण्याच्या पाण्याची योजना तत्त्वतः मंजूर केल्याचे सांगितले होते. मात्र ही योजना अद्याप पूर्ण झाली नसल्याने योजना तत्त्वतः म्हणजे काय? असा सवाल करत योजना मंजूर करायची असते, अशी टीका अजित पवारांनी केली. यावेळी अजित पवार यांनी माजी आमदार राम शिंदे यांना देखील टीकेचे लक्ष केले. 'राम शिंदे यांना झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांनी तुम्हाला का नाकारले याचा विचार करा आणि आत्मपरीक्षण करा. रोहित काम करतोय त्याला करू द्या आणि तुम्ही गप्प गुमान बसा', असा सल्लावजा टोलाही पवारांनी लगावला. यवतमाळमधील अशोक पाल हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले, धक्कादायक कारण समोर अमरावती येथे आज सकाळपासूनच तणावाला सुरुवात झाली आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, 'काही विघ्नसंतोषी लोकांमुळे समाजात दंगल पसरते आणि यात सामान्य माणसाचे नुकसान होते. त्यामुळे अफवा पसरवू नये' असे अजित पवारांनी आवाहन केलं.
  Published by:sachin Salve
  First published: