• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Twins Island : या गावात सर्वत्र दिसतात जुळी मुलं, माणसं; रहस्यामागील कारण कोणालाच माहीत नाही

Twins Island : या गावात सर्वत्र दिसतात जुळी मुलं, माणसं; रहस्यामागील कारण कोणालाच माहीत नाही

सर्वात मोठी समस्या नवीन विवाहित जोडप्यांना येते. अलबाटमध्ये वास्तव्याला असलेल्या अँटोनिया नावाच्या महिलेनं सांगितलं, 'मला जुळी बहीण आहे. लग्न झाल्यानंतर माझ्या पतीला मला ओळखणं कठीण जायचं. दोघींमध्ये तो गोंधळून जायचा.

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : जगभरात अनेक रहस्यमय गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यामागची रहस्यं उलगडण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. असंच एक रहस्यमय ठिकाण म्हणजे फिलिपिन्स (Philippines) देशातल्या एका बेटावर वसलेलं अलबाट (Alabat, Philippines) हे गाव. अलबाट हे गाव मासेमारीसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. तसंच आणखी एक गोष्ट या गावाला खास बनवते. ती म्हणजे तिथली जुळ्या (Twins) लोकांची संख्या. तिथे दर तिसऱ्या घरात तुम्हाला जुळी मुलं, माणंस पाहायला मिळतील. जुळी मुलं ही नेहमीच आकर्षणाचं केंद्र असतात. गर्दीमध्ये बाहेर तुम्हाला क्वचितच जुळी मुलं दिसतील; मात्र अलबाट (Twins Island) या गावात गेल्यावर शाळा असो किंवा बाजार असो, सर्वत्र जुळी मुलं, माणसं सहज नजरेस पडतात. तिथली एवढी जुळी लोकं पाहून चक्रावून जाल हे निश्चित. द सन वेबसाइटच्या 2018 मधल्या वृत्तानुसार, अलबाटमध्ये (Twins Village Philippines) 15,000 कुटुंबं वास्तव्याला आहेत. त्यातील सुमारे 100 जुळी जोडपी आहेत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, या गावात असे काय आहे, ज्यामुळे तिथे जुळी मुलं जन्माला येतात, याचं कारण कोणालाच माहीत नाही. 4 महिन्यांच्या लहान मुलांपासून ते 86 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीपर्यंत जुळी जोडपी तुम्हाला त्या गावात दिसतील. हे वाचा - OMG! मॉडेलने 13 कोटी खर्च करून केला आपल्या केवळ एका अंगाचा इन्शूरन्स गावात राहणारी जुळी मंडळी एकसारखेच कपडे घालतात. त्यामुळे त्यांना ओळखणं आणखीच अवघड जातं. विशेषतः शाळेत शिक्षकांना मुलं ओळखणं कठीण जातं. दुसरी सर्वात मोठी समस्या नवीन विवाहित जोडप्यांना येते. अलबाटमध्ये वास्तव्याला असलेल्या अँटोनिया नावाच्या महिलेनं सांगितलं, 'मला जुळी बहीण आहे. लग्न झाल्यानंतर माझ्या पतीला मला ओळखणं कठीण जायचं. दोघींमध्ये तो गोंधळून जायचा. यात अनेक लाजिरवाण्या गोष्टीही घडल्या. मग आम्ही त्याला दोघींमध्ये असलेल्या एका फरकाची ओळख करून दिली. माझ्या नाकावर तीळ आहे आणि तिच्या नाही. हे माहिती झाल्यानंतर त्याला मला ओळखणं सोपे जाऊ लागलं.' हे वाचा - राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती बिकट; आठवडाभर शाळा राहणार बंद, सरकारी कर्मचाऱ्यांना Work From Home वृत्तांनुसार, तिथल्या महिलांनी प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी विशेष औषधं घेतली होती. त्यानंतर 1996 ते 2006 या काळात 35 वर्षांच्या महिलांमध्ये मल्टिपल प्रेग्नन्सीमध्ये 182 टक्क्यांनी वाढ झाली होती; मात्र या ठिकाणी इतक्या जुळ्या मुलांच्या जन्मामागचं शास्त्रीय कारण काय आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. याचं कारण शोधण्यासाठी कोणतंही शास्त्रीय संशोधन झालेलं नाही. जुळ्यांच्या या जन्मांमुळे अलबाट हे गाव जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालं आहे. या गावाला 'जुळ्यांचं गाव' (Philippines Island of Twins) म्हणूनही ओळख मिळाली आहे.
  First published: