यवतमाळ, 13 नोव्हेंबर : यवतमाळमधील (yavatmal) वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.अशोक पाल (dr. asok paal murder case) हत्येचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी आज 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गाडीवर धक्का लागण्याच्या कारणावरून पाल याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Vasantrao Naik Government Medical College yavatmal) अंतिम वर्ष शिक्षण घेणारे डॉ. अशोक पाल यांची 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या विद्यार्थी आणि नातेकवाईकांनी आंदोलन करून आरोपांच्या अटकेची मागणी केली होती. त्यामुळे वाता पोलिसांनी या प्रकरणी सूत्र फिरवत तपास सुरू केला. मात्र कुठलाच सुगावा हाती लागत नव्हता. यात सायबर सेलची सुद्धा मदत घेण्यात आली. तीन दिवसांनंतर पोलिसांनी अखेर 3 आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली. या आरोपीमध्ये ऋषीकेश साळवे, प्रवीण गुंडजवार (रा यवतमाळ) आणि एक अल्पवयीन मुलगा असे तिघांचा समावेश आहे. भिवंडीत मेट्रोचे काम सुरू असताना सळईचा सांगाडा कोसळला, 8 जण जखमी अशोक पाल हा ग्रंथालयातून वस्तीगृहकडे जात असताना त्याला दुचाकीवरून जात असलेल्या काही तरुणांचा गतिरोधकावर धक्का लागला. त्यामुळे अशोक पाल आणि आरोपींमध्ये वादावादी झाली. या तिन्ही तरुणांनी त्याला मारहाण केली आणि यातच अशोकवर आरोपींनी चाकूने वार केले. चाकूचा वार वर्मी लागल्यामुळे अशोक जागेवरच कोसळला आणि यात त्याचा मृत्यू झाला. तो रक्ताच्या थोरोळ्यात कोसल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर काही लोकांनी उचलून त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर दिसणार हिंदी मालिकेत, साकारणार ऐतिहासिक भूमिका या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एकूण 7 पथकं तयार करण्यात आली होती. कार्यान्वित 100 माहितीगाराची टीमची मदत घेण्यात आली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.