साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर,22 मार्च : शोभायात्रा आणि त्यामध्ये सहभागी झालेले पारंपारिक वेशभूषेतील तरुण-तरुणी असे सगळे दृश्य गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाहायला मिळत असते. अशाच प्रकारचे प्रसन्न करणारे वातावरण गुढीपाडव्याच्यानिमित्ताने कोल्हापुरात पाहायला मिळाले. आपल्या संस्कृतीचा जागर करणारी भव्य शोभायात्रा करवीर गर्जना ढोल ताशा पथकाद्वारे कोल्हापुरात काढण्यात आली होती.
कोल्हापुरात करवीर गर्जना ढोल ताशा पथक हे गेली 6 वर्ष अशा प्रकारची शोभायात्रा आयोजित करत आहे. यंदाच्या या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत "सांस्कृतिक लोककलांची अमृतधारा, जतन करु महाराष्ट्राची लोकधारा" ही संकल्पना घेऊन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते.
तुळजापुरात गुढीपाडव्याचा उत्साह; तुळजाभवानी मंदिरात उभारली गुढी, पहा खास फोटो
काय काय पाहायला मिळाले शोभा यात्रेत?
पारंपारिक वेशभूषेत असणाऱ्या महिला, तरुणी आणि तरुण यांची बाईक रॅली, पारंपारिक वेशभूषेत सामील झालेले बालचमू, घोड्यावर स्वार झालेल्या रणरागिनी आणि छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेतील तरुण, बैलगाड्या, इस्कॉन हरी मंदिर येथील भक्तगण, लेझीम पथक, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवणारे पथक, ध्वजपथक, ढोल ताशा पथक सहभागी झाले होते.
यंदाच्या संकल्पनेवर आधारित लोककलांचे दर्शन, साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असे तीन चित्ररथही यंदाच्या शोभायात्रेत कोल्हापूरकरांना याची देही याची डोळा अनुभवता आले. त्याचबरोबर मराठी मालिकांमधील कलाकार देखील या शोभायात्रेत मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. या मराठी कलाकारांमुळे या शोभा यात्रेची शोभा अजूनच वाढली असे करवीर गर्जनाच्या केतकी कुलकर्णी यांनी सांगितले.
शोभायात्रेत दिसली डोंबिवलीकर 'अस्मिता', मराठी अभिनेत्रीनं दिला आठवणींना उजाळा, Video
काय होता शोभायात्रेचा मार्ग ?
सकाळी साधारण 10 नंतर सुरू झालेली ही शोभायात्रा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाव्दार रोड, गुजरी कॉर्नर या मार्गे, भवानी मंडप या ठिकाणी येऊन संपन्न झाली.
परंपरा जपली पाहिजे
शोभायात्रेत अनेक युवती पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. वर्षातील मोजकेच दिवस अशा पद्धतीने पारंपारिक वेशभूषा करता येते. त्या निमित्ताने या शोभा यात्रेला एक विशेष महत्त्व आहे आणि आपल्या पारंपारिक वेशभूषाची आणि आपल्या संस्कृतीची ही परंपरा अशीच जपली गेली पाहिजे असे मत यावेळी बाईक रायडर गायत्री पटेल व्यक्त केले.
Gudi Padwa 2023 : कुर्ल्यातील शोभा यात्रेत रंगला प्रात्याक्षिकांचा थरार, पाहा Video
छोटा ढोल वादकही सहभागी
या शोभायात्रेत एक लहान ढोल वादक देखील आजूबाजूच्या नागरिकांच्या नजरेत भरत होता. 7 वर्षे वयाचा आरुष साळुंखे हा वादक पथकातील इतर मोठ्या ढोल वाजकांप्रमाणेच हिरीरीने ढोल वाजवत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gudi Padwa 2023, Kolhapur, Local18