हिंदू धर्मीयांचं नवीन वर्ष सुरू होतं ते (Gudhi Padwa) गुढीपाडव्यापासून. चैत्र महिना (Chaitra) हा हिंदू महिन्यांमधला पहिला महिना. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असतो. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा एक मुख्य मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, नवीन घर खरेदी किंवा कोणत्याही नव्या उपक्रमाचा/ कामाचा शुभारंभ केला जातो. गुढीपाडव्याला सोन्याची खरेदीही शुभ मानली जाते.
या दिवसाचं हिंदू धर्मात अनन्यासाधारण महत्त्व आहे. याच दिव