मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शोभायात्रेत दिसली डोंबिवलीकर 'अस्मिता', मराठी अभिनेत्रीनं दिला आठवणींना उजाळा, Video

शोभायात्रेत दिसली डोंबिवलीकर 'अस्मिता', मराठी अभिनेत्रीनं दिला आठवणींना उजाळा, Video

X
Gudi

Gudi Padwa 2023 : नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण डोंबिवलीकर आणि मराठी कलाकार या शोभायात्रेत सहभागी झाले होते.

Gudi Padwa 2023 : नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण डोंबिवलीकर आणि मराठी कलाकार या शोभायात्रेत सहभागी झाले होते.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India

  अनिरुद्ध जाहगीरदार,प्रतिनिधी

  डोंबिवली, 22 मार्च : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा निमित्त राज्यभरात गुढीपाडव्याचा सण जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्यभरात शोभायात्रा काढण्यात आल्या. गुढीपाडव्याच्या निमित्ताने डोंबिवलीमधेही शोभायात्रा काढण्यात आली होती. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण डोंबिवलीकर आणि मराठी कलाकार या शोभायात्रेत सहभागी झाले होते.

  डोंबिवलीतील शोभयात्रेचे या वर्षी हे रौप्य मोहोत्सवी वर्ष होते. यावर्षी वसुधैव कुटुंबकम ही या शोभायात्रेची थीम होती. श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे ही गुढीपाडव्याची शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण डोंबिवलीकरासह मराठी कलाकार सुद्धा सहभागी झाले होते.

  तुळजापुरात गुढीपाडव्याचा उत्साह; तुळजाभवानी मंदिरात उभारली गुढी, पहा खास फोटो

  या शोभायात्रेत मराठी मालिकेतील अभिनेता नकुल घाणेकर, अभिनेत्री मयुरी वाघ त्याचप्रमाणे महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतील अभिनेत्री शिवाली परब, अभिनेता चेतना भट यांनीही उपस्थिती लावली होती. सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी मूळची डोंबिवलीची आहे. लहानपनापासून मी या यात्रेत सहभाग घेतलेला आहे. या शोभायात्रेत सहभागी होऊन छान वाटत आहे. कोरोनानंतर सर्व जण दोन वर्षांनी येथे आले आहेत. मोठ्या उत्साहाने सर्वजण गुढीपाडव्याचा सण साजरा करत आहेत, अशी प्रतिक्रया अभिनेत्री मयुरी वाघहिने यावेळी दिली.

  दरम्यान, शाळकरी मुलं, महाविद्यालयीन तरूण यांच्या विविध पथकांद्वारे ढोल ताशा वादनही मोठ्या उत्साहाने शोभायात्रेत पार पडले. या शोभायात्रेत विविध प्रकारच्या चित्ररथांची सुंदर व भव्य यात्रा काढण्यात आली. यामध्ये डोंबिवली रनर्स ग्रुपच्या माध्यमातून आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली. ज्या चौकात शोभायात्रा थांबली तेथे आरोग्य कसे जपावे या विषयी माहिती देण्यात आली. विविध योगासने केले गेले. तसेच या ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जातात. हा ग्रुप डोंबिवलीच्या शोभायात्रेत आकर्षणाचा विषय ठरला.

  First published:
  top videos

   Tags: Entertainment, Gudi Padwa 2023, Local18, Mumbai