धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 22 मार्च : गुढीपाडव्याच्या निमित्तनं नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आता राज्यातील वेगवेगळ्या भागात शोभायात्रा निघत आहेत. मुंबईतील कुर्ला भागातही या निमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत सादर करण्यात आलेल्या प्रात्याक्षिकांनी मुंबईकरांची मनं जिंकली.
काय होती संकल्पना?
गेल्या पंधरा वर्षापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीकडून कुर्ल्यामध्ये याचं आयोजन केले जाते. गेल्या पंधरा वर्षात वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित शोभायात्रा आयोजित केली जाते. यंदा देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे 'यशोस्तुते भरारी स्वतंत्र भारताची' या संकल्पनेवर आधारित शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं.
बाईकर्सची धूम, रणरागिणींचा थाट.. डोंबिवलीच्या शोभायात्रेत पाहा काय होतं खास! Photos
या शोभायात्रेत भारताने 75 वर्षात केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा मानण्यात आला होता. त्याच बरोबर जागतिक पातळीवर देशाचा प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख व्यक्तींच्या लहान मुलांनी वेशभूषा परिधान केल्या होत्या.
ढोल-ताशांचा गजर आणि नऊवारीचा थाट, गिरगावच्या शोभायात्रेत तरुणाईचा जल्लोष! Video
या यात्रेचे प्रमुख संयोजक किरण दामले यांनी यंदाच्या यात्रेबाबत सविस्तर माहिती दिली. ''यशोस्तुते भरारी स्वतंत्र भारताची' ही संकल्पना यंदा राबविण्यात आली. याच संदर्भात कुर्ल्यातील भारत सिनेमा येथे भव्य देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांचे मनोरे, ढोल ताशा पथक, लेझीम पथक, हलगी पथक यांनी कुर्लामध्ये चैतन्य निर्माण केलं. त्याचबरोबर पारंपारिक वेशभूषेतील अनेक मंडळी या यात्रेमध्ये सहभागी झाली आहेत, ' असं दामले यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gudi Padwa 2023, Local18, Mumbai