कोल्हापूर, 2 डिसेंबर : देशभरामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा होतो. दिवाळीच्या कालावधीमध्ये कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील एका गावात असे काहीच वातावरण नसते. तिथे दिवाळीच साजरी होत नाही. ही आश्चर्यकारक गोष्ट गेल्या कित्येक वर्षांपासून कोलोली गावात घडत आहे. काय आहे कारण? विविध परंपरेने नटलेल्या या गावातील बरेचजण शासकीय अधिकारी आहेत. या गावच्या दिवाळी सण साजरा न करण्यामागे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. या गावाची मान्यता आहे की, सर्वत्र ऑक्टोबरमध्ये साजरी होणारी दिवाळी ही आपली दिवाळी नव्हे.. तर गाडाई देवीची धाकटी दिवाळी हीच आपली खरी दिवाळी..त्यामुळे दिवाळी सणावेळी सगळीकडे सामान्य दिवसा प्रमाणे या गावात वातावरण असते. देवदिवाळीच्या काळात या गावमध्ये घर सजवणे, पणत्या लावणे, रांगोळी काढणे, नवीन कपडे घेणे अशा सगळ्या गोष्टी गावकरी करत असतात. ऑक्टोबर महिन्यातील दिवाळीत घरांवर काहीच सजावट न करणारे गावकरी या देवदिवाळीत घरांवर आकशकंदील, लाईटमाळा लावत असतात. सामान्यतः दिवाळीसाठी केला जाणारा फराळही येथे देवदिवाळीत केला जातो. खंडोबा-म्हाळसा विवाहात ‘या’ हळदीला का असतो विशेष मान? Video खरंतर या सगळ्याबाबत एक अख्यायिका सांगितली जाते. गावचे ग्रामदैवत श्री गाडाईदेवीची यात्रा ही धाकटी दिवाळी असते. हीच गावची देवदिवाळी.. म्हणून ही दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करण्याची प्रथा आहे, असे गावकरी सांगतात. कोलोलीच्या गाडाईदेवीची यात्रा ही मोठी दिवाळी असते. ही धाकटी दिवाळीच आमची खरी दिवाळी आहे. गावात कोणीच मोठी दिवाळी साजरी करत नाहीत. ही धाकटी दिवाळीच मोठ्याने साजरी केली जाते. यानिमित्ताने गावातील सगळ्या माहेरवासिनी देव दिवाळीला देवीला ओटी भरायला येतात. असं कलोली गावातील गृहिणीनं सांगितलं कशी असते दिवाळी? कोलोली गावात साजरी होणारी ही देवदिवाळी तीन दिवस चालते. पहिल्या दिवशी सुहासिनी महीला देवीची खणा-नारळाने ओटी भरतात. देवीला पुरणपोळीच्या नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी लाल मातीतील कुस्त्या देखील आयोजित केल्या जातात. लहान मुले-मुली मर्दानी खेळ, लेझीम यांची प्रात्यक्षिके दाखवतात. गावात मनोरंजनासाठी लहान-मोठे पाळणे आलेले असतात. त्यामुळे सगळीकडे आनंदी वातावरण असते. Sarees on EMI : लग्नाची बिनधास्त करा खरेदी, ‘इथं’ घ्या ईएमआयवर साड्या! त्याचबरोबर सायंकाळी मांसाहारी जेवणावळीचा मोठा बेत देखील आखण्यात आलेला असतो. धाकट्या दिवाळीच्या परंपरेमुळे पन्हाळा तालुक्यात हे गाव देवदिवाळीसाठी प्रसिद्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







