मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Sarees on EMI : लग्नाची बिनधास्त करा खरेदी, 'इथं' घ्या ईएमआयवर साड्या! पाहा Video

Sarees on EMI : लग्नाची बिनधास्त करा खरेदी, 'इथं' घ्या ईएमआयवर साड्या! पाहा Video

मोबाईल, फ्रिज, टी. व्ही या प्रकारच्या वस्तू EMI वर मिळतात हे माहिती आहे. मात्र चक्क साडी EMI वर ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण हे शक्य आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 नोव्हेंबर : लग्न म्हंटलं की कपडे खरेदी आलीच. लग्नात अनेक कार्यक्रम असतात. प्रत्येत कार्यक्रमात वेगळी साडी तर हवीच. त्यामुळे साडी खरेदीसाठी बजेट वाढवावे लागते. त्याचबरोबर लग्नात इतरही खर्च असतात. त्या खर्चांचा विचार करुन साडी खरेदीचं बजेट आखडतं घ्यावं लागतं. तुमची ही चिंता कमी करण्यासाठी मुंबईतील एका दुकानानं चक्क EMI वर साड्या खरेदी करण्याची सोय केली आहे.

आपल्याला मोबाईल, फ्रिज, टी. व्ही या प्रकारच्या वस्तू EMI वर मिळतात हे माहिती आहे. मात्र चक्क साडी EMI वर ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण आता हे शक्य आहे.

साड्यांचे अनेक पर्याय

लग्नसराई सुरु होऊन अवघे काहीच दिवस उलटले आहे. लग्नाचा बस्ता खरेदीला वेग आला आहे. मुंबईच्या दादर येथील प्रसिद्ध साडी मार्केट मध्ये साड्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळी गडद, धूपछाव रंगाच्या साड्या वापरल्या जायच्या. या वर्षी पुन्हा धूपछाव आणि गडद रंगांच्या साड्यांचा ट्रेंड पाहायला मिळतोय. पैठणी,कांजीवरम, तसेच इतर साड्यांमध्ये फ्युजन करून असा नवा ट्रेंड ग्राहकांचं आकर्षण ठरतोय.

लग्नामध्ये काढा सोप्या पद्धतीनं सुंदर मेंदी, सर्वांवर पडेल तुमचं इंप्रेशन! Video

लग्नसराईसाठी साड्यांचे विशेष संग्रह बाजारात दाखल करण्यात आले आहेत. पैठणी, सेमी पैठणी, कांजीवरम, ब्रोकेट सिल्क, रोज गोल्ड जरी, मलाई सिल्क, कलकत्ता सिल्क, नवरीची नऊवारी, कॉटन सिल्क,ई प्रकारच्या साड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

गुगल मॅपवरून साभार

मुंबईत पहिल्यांदाच EMI वर साड्या!

दादर पश्चिम येथील हरीओम साडी सेंटर येथे इएमआयवर साड्या मिळतात. 5000 रुपयांच्या वरील खरेदीवर नो कॉस्ट EMI वर साडी विक्री होते. या दुकानात साड्यांचे दर सुद्धा सामान्यांना परवडतील असेच आहेत. बेंगळुरू, कोलकाता, सुरत, या शहरातून इथं साड्या येतात.  500 रुपये ते 30000 रुपयांपर्यंत येथे साड्या उपलब्ध आहेत. ई. एम. आयवर साड्या आणि लग्नाचे ड्रेस मिळत असल्यामुळे ग्राहकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळतोय.

...नाटकं सांगायची न्हाईत! अस्सल कोल्हापुरी भाषेतील लग्न पत्रिका व्हायरल, पाहा Video

'लग्नाची खरेदी मोठी असते. कधी-कधी ग्राहक बजेटच्या बाहेरच्या साड्या, लेहंगा घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आम्ही इएमआयवर साड्यांची विक्री सुरू केली. या प्रकारची सोय असलेलं हे मुंबईतील एकमेव दुकान आहे, असं हरीओम साडी सेंटरचे मालक आदित्य जोइजोडे यांनी सांगितलं.

First published:

Tags: Local18, Marriage, Mumbai, Saree, Shopping