• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला शिवसेनेचं 'ऑपरेशन धनुष्यबाण'ने उत्तर, एकनाथ शिंदेंची मोठी कामगिरी

भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला शिवसेनेचं 'ऑपरेशन धनुष्यबाण'ने उत्तर, एकनाथ शिंदेंची मोठी कामगिरी

केडीएमसीत भाजपची (BJP) सत्ता स्थापण करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी सुरु आहे. पण भाजपला धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे. भाजपच्या 'मिशन लोटस'ला Mission Lotus) आता शिवसेनेकडून 'ऑपरेशन धनुष्यबाण'ने उत्तर देण्यात येतंय.

 • Share this:
  ठाणे, 22 नोव्हेंबर : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या (KDMC election 2022) पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. विशेष म्हणजे भाजपचं 'ऑपरेशन लोटस' (Mission Lotus) ही संकल्पना सर्वश्रूत आहे. केडीएमसीत भाजपची (BJP) सत्ता स्थापण करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी सुरु आहे. पण भाजपला धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे. भाजपच्या 'मिशन लोटस'ला आता शिवसेनेकडून 'ऑपरेशन धनुष्यबाण'ने उत्तर देण्यात येतंय. कारण भाजपचे पाच नगरसेवक (Corporaters) शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज संध्याकाळी पार पडणार आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

  भाजपच्या रविंद्र चव्हाणांच्या नगरसेवकांना शुभेच्छा

  कल्याण डोंबिवली महापालिकेची मुदत संपली आहे. कोरोना संकटामुळे केडीएमसी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे शहारत सध्या प्रशासकीय राजवट सुरु आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता ओसरल्याने महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आपली सत्ता स्थापन व्हावी यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. भाजपचे एकीकडे प्रयत्न सुरु असताना शिवसेनेच्या एकनाथ शिंदेकडूनही तोडीस तोड प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातूनच भाजपचे पाच नगरसेवक आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे या पाच नगरसेवकांना भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हेही वाचा : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात मोठी अपडेट

  शिवेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप बाजी मारणार?

  खरंतर कल्याण-डोंबिवलीला शिवेसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो. कल्याणचे अनेक लोकप्रतिनिधी हे शिवसेनेचेच आहेत. पण गेल्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारली होती. त्यावेळी राज्यात युतीचं सरकार होतं. तरीही शिवसेना आणि भाजप यांनी वेगवेगळी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेला 52 जागांवर यश मिळालं होतं. तर भाजपला तब्बल 42 जागा मिळाल्या होत्या. शिवसेना आणि भाजपच्या तुलनने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फार कमी जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादीला 2, काँग्रेसला 4, एमआयएमला 1 तर अपक्षांना 10 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर आता आगामी माहापालिकेत नेमकं कोण बाजी मारतं ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  आगामी निवडणुकीचे गणितं फार वेगळी

  कल्याण-डोंबिवली महापालिकेच आगामी निवडणूक ही फार वेगळी असणार आहे. त्यामागे गेल्या दोन वर्षात घडलेल्या राजकीय घडामोडी कारणीभूत ठरणार आहेत. राज्यात दोन वर्षांपूर्वी विधानसभेची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपचा हात सोडत राष्ट्रवादी-काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली होती. या आघाडीमुळे कल्यामधीलही राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होणार असल्याचा अंदाज बांधला जातोय. तर महाविकास आघाडी एकत्र लढून भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्र निवडणुकीचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे केडीएमसीत महापालिकेच्या निवडणुकीचा चांगलाच धुराळा उडताना दिसणार आहे. हेही वाचा : विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं विदर्भात बड्या नेत्याचा BJP ला रामराम

  27 गावांच्या निकालावर प्रभार रचना अवलंबून

  दरम्यान, केडीएमसीत 27 गावांच्या प्रश्नांवर अजूनही हवा तसा तोडगा निघालेला नाही. केडीएमसीच्या 122 प्रभागांमध्ये सध्या तरी 27 गावांचा समावेश आहे. पण याबाबत स्थानिक संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण न्यायालयाचा जपर्यंत निर्णय येणार नाही तोपर्यंत केडीएमसीची प्रभाग रचना ठरणार नाही, हे देखील एक वास्तव आहे.
  Published by:Chetan Patil
  First published: