नागपूर, 22 नोव्हेंबर: विधान परिषदेच्या (Legislative Council) नागपूर जिल्हा (Nagpur district)स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी भाजपने (BJP) माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे विनोद तावडे नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील भाजप कडून पुनर्वसन होताना दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून ही निवडणूक लढायला कोणीही फारसे उत्सूक नसल्याने शेवटल्या क्षणाला भाजप (BJP corporator Chhotu Bhoyar) नगरसेवक छोटू भोयर (रविंद्र भोयर) यांना काँग्रेसमध्ये आयात करून त्यांना उमेदवारी देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.
छोटू भोयर हे भाजपमधून आल्याने ते भाजपच्या मतांना सुरुंग लागेल या आशेने काँग्रेसने त्यांना रिंगणात उतरायची तयारी दाखवली. आज चंद्रशेखर बावनकुळे हे उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि इतर नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
छोटू भोयर यांचा राजीनामा
भाजपवर नाराज असलेले विदर्भातील नेते छोटू भोयर (रवींद्र भोयर) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. छोटू भोयर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भोयर रेशीमबाग प्रभागाचे नगरसेवक होते. आज ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपसाठी 34 वर्षांपासून झटत आलो आहे. मात्र त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला, मला दाबण्यात आलं आणि त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं भोयर यांनी सांगितलं.
हेही वाचा- VIDEO: बाबर आझमची कमाई किती? पाकिस्तानच्या कॅप्टनचं उत्तर ऐकूण आवरणार नाही हसू
भोयर यांची आईही भाजपाची नगरसेविका होती, संघ परिवार परिवाराच्या अतिशय जवळचे संबंध आहेत. काँग्रेसकडून कोणीही लढायला इच्छुक नसल्याने शेवटी काँग्रेस नेत्यांना भाजपच्या उमेदवाराला आयात करून उमेदवारी द्यावी लागते.
पुढे रवींद्र भोयर म्हणाले की, भाजपला वाढवण्यासाठी दिवस-रात्र काम केलं. अनेक नवीन लोकांना पक्षात आणले, त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला. मला दाबण्यात आलं आणि त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.आजच मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेसकडून अद्यापही विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी कुठलाही शब्द देण्यात आलेला नसल्याचंही भोयर यांनी सांगितलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
काँग्रेसने जरी विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे नगरसेवक रवींद्र भोयर यांना विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली असली तरी भाजपचे मते फुटणार नसल्याचा विश्वास भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP