मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर, अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याची तयारी

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर, अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याची तयारी

'या विधेयकांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल असे मी तुम्हाला आश्वासित करतो'

'या विधेयकांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल असे मी तुम्हाला आश्वासित करतो'

राज्य विधिमंडळाचं (state legislature) हिवाळी अधिवेशनासंदर्भात (winter session) मोठी अपडेट समोर आली आहे.

मुंबई, 22 नोव्हेंबर: राज्य विधिमंडळाचं (state legislature) हिवाळी अधिवेशनासंदर्भात (winter session) मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन लांबणीवर गेलं असल्याची माहिती समोर येतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या तब्येतीमुळे 7 डिसेंबर पासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची राज्य सरकार तयारी करत असल्याचं समजतंय.

त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेना विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते जयंत पाटील, काँग्रेसचे गट नेते बाळासाहेब थोरात येत्या दोन ते तीन दिवसांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. या भेटीदरम्यान हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा- विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं विदर्भात बड्या नेत्याचा BJP ला रामराम 

हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. नियोजित अधिवेशनाला 15 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अधिवेशनाच्या महिनाभर आधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होते. मात्र अद्याप अधिवेशनाच्या तयारीची काहीही हालचाल दिसून येत नाही आहे. त्यातच शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंना देखील अजूनही डिस्चार्ज मिळालेला नाही आहे.

हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत?

प्रथा आणि पंरपेरनुसार हिवाळी अधिवेशन नागपूरला होत असतं. मात्र मुख्यमंत्र्यांची तब्येत लक्षात घेता अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भातला निर्णय लवकरच या आठवड्यात सरकार आणि प्रशासन घेणार असल्याचं समजतंय.

हेही वाचा- गौतम गंभीरनं केली रवी शास्त्रींवर टीका, टीम इंडियावरील वक्तव्याबाबत साधला निशाणा

तर दुसरीकडे अधिवेशन नागपूरलाच व्हावं यासाठी भाजपचे नेते आग्रही आहेत. तर हिवाळी अधिवेशन मुंबईतच व्हावं यासाठी शिवसेना काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे.

हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये झाले पाहिजे- आमदार रवी राणा

नियमाप्रमाणे हिवाळी अधिवेशन हे नागपूरला झाले पाहिजे ही परंपरा आहे, असं आमदार रवी राणा म्हणालेत. विदर्भातील जनता, शेतकरी, शेतमजूर हे या अधिवेशनाची वाट पाहत असतात आणि यामध्ये विदर्भाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागतात, असं त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा- VIDEO: बाबर आझमची कमाई किती? पाकिस्तानच्या कॅप्टनचं उत्तर ऐकूण आवरणार नाही हसू

तर मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असल्याने त्यांनी त्यांची तब्येतीची काळजी घ्यावी. त्यांचा ज्यांच्यावर विश्वास असेल अशा व्यक्तीला प्रभारी मुख्यमंत्री पद देऊन हे अधिवेशन घेण्यात यावे आणि विदर्भाच्या जनतेला न्याय द्यावा अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Vidhan sabha, Winter session