मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Jalgaon Crime News: भुसावळमधील हत्या प्रकरणाचा 16 महिन्यांनी उलगडा, धक्कादायक माहिती झाली उघड

Jalgaon Crime News: भुसावळमधील हत्या प्रकरणाचा 16 महिन्यांनी उलगडा, धक्कादायक माहिती झाली उघड

Murder case solved after 16 months, shocking information revealed: जळगावमधील पोलिसांनी एका हत्या प्रकरणाचा तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल 16 महिन्यांनंतर आरोपीला गजाआड करण्यात आले असून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Murder case solved after 16 months, shocking information revealed: जळगावमधील पोलिसांनी एका हत्या प्रकरणाचा तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल 16 महिन्यांनंतर आरोपीला गजाआड करण्यात आले असून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Murder case solved after 16 months, shocking information revealed: जळगावमधील पोलिसांनी एका हत्या प्रकरणाचा तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल 16 महिन्यांनंतर आरोपीला गजाआड करण्यात आले असून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जळगाव, 28 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) भुसावळ येथील लक्ष्मीनारायण नगरमध्ये (Laxmi Narayan Nagar Bhusawal) काही दिवसांपूर्वी एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला आणि 16 महिन्यांनंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ही माहिती उघड झाल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पत्नीनेच केली हत्या

पोलिसांनी सखोल चौकशी करत तब्बल 16 महिन्यांनी या घटनेचा उलगडा करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे आरोपी ही महिला असून मृतकाची पत्नी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून एका महिलेने पतीची हत्या करत पतीने आत्महत्या केल्याचा बनाव करून पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पण पोलिसांच्या तपासात आणि चौकशीत बिंग फुटलं आणि अखेर आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा : एकापाठोपाठ 3 चिमुरड्यांवर बॅटरी वॉटरने हल्ला, यवतमाळमधील धक्कादायक घटना

दारुसाठी पैसे देण्यास नकार, लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेची केली भयानक अवस्था

एका व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या गर्लफ्रेंडचं नाक कुऱ्हाडीनं कापलं आहे. त्या महिलेनं केवळ त्याला दारूसाठी पैसे देण्यास नकार दिला. त्या रागाच्या भरात त्यानं हे वाईट कृत्य केलं आहे. आरोपी बॉयफ्रेंडनं पीडित महिलेकडे दारु पिण्यासाठी दोनशे रुपये मागितले होते. पण ते पैसे देण्यास तिनं त्याला नकार दिला.

ही घटना मध्यप्रदेश येथील खंडव्यातील बामणगावची आहे. येथे 35 वर्षीय महिला तिचा बॉयफ्रेंड लवकुशसोबत दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. पीडित महिलेच्या पतीचं आठ वर्षांपूर्वी निधन झालं. ती कशीतरी शेतात काम करून उदरनिर्वाह करत आहे, तर तिचा बॉयफ्रेंड लवकुश नेहमी दारु पितो. तसंच तो काहीही कामधंदा करत नाही.

वाचा : दारु तस्करीचा अनोखा प्रकार, पूर्ण शरीरालाच बनवलं दारूची टाकी

महिला सरपंचाचा विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका गावच्या महिला सरपंचाचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे. तुडील भेलोशी रस्त्यालगत आदीस्ते गावच्या उबटआळी रस्त्यालगत सोमवारी दुपारी जंगलात सदर महिला फाटी आणण्यासाठी गेली असता ही घटना घडली. गावातील एक तरुण महाडकडे येत असताना रस्त्यालगत फाट्यांची भारी पाहिली. मात्र कोणीही दिसले नाही म्हणून सदर तरुणाने परीसरात बघले असता रस्त्यालगत जंगल भागत सदर महिला मृतावस्थेत दिसून आली. मृतदेह विवस्त्र असल्याने अतीप्रसंग अगर बलात्काराचा संशय व्यक्त केला जात आहे. महाडचे पोलीस अधिक्षक, तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

First published:
top videos

    Tags: Crime, Jalgaon, Murder