मध्य प्रदेश, 28 डिसेंबर: मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) खंडवा जिल्ह्यातून (Khandwa District) एक भयानक बातमी समोर येत आहे. एका व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या गर्लफ्रेंडचं नाक (Nose) कुऱ्हाडीनं कापलं आहे. त्या महिलेनं केवळ त्याला दारूसाठी पैसे देण्यास नकार दिला. त्या रागाच्या भरात त्यानं हे वाईट कृत्य केलं आहे. आरोपी बॉयफ्रेंडनं पीडित महिलेकडे दारु पिण्यासाठी दोनशे रुपये मागितले होते. पण ते पैसे देण्यास तिनं त्याला नकार दिला.
ही घटना खंडव्यातील बामणगावची आहे. येथे 35 वर्षीय महिला सोनू तिचा बॉयफ्रेंड लवकुशसोबत दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. सोनूच्या पतीचं आठ वर्षांपूर्वी निधन झालं. ती कशीतरी शेतात काम करून उदरनिर्वाह करत आहे, तर तिचा बॉयफ्रेंड लवकुश नेहमी दारु पितो. तसंच तो काहीही कामधंदा करत नाही.
हेही वाचा- Exclusive Video: खुल जा सिम सिम..! पियूष जैननं 'या' कोपऱ्यात लपवला होता खजिना
ही महिला दोन वर्षांपासून तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.
शनिवारी सकाळी दारूच्या नशेत त्याने पुन्हा सोनूकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सोनू शेतात मजुरीसाठी जात होती. तिनं त्याला पैसे देण्यास नकार दिल्यानं रागाच्या भरात लवकुशने कुऱ्हाडीने तिचे नाक कापले.
हेही वाचा- मुंबईकरांनो..! 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशन संदर्भातली मोठी बातमी
खंडवा सिटी कोतवालीचे प्रभारी बलजीत सिंह बिसेन यांनी सांगितलं की, शेजाऱ्यांच्या मदतीने सोनूला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे उपचारानंतर ती आता धोक्याबाहेर आहे. दरम्यान, सोनूच्या तक्रारीनंतर लवकुशविरुद्ध कोतवाली पोलिसांनी भादंवि कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Madhya pradesh