मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /सडपातळ होतो जाडजूड! दारु तस्करीचा अनोखा प्रकार, पूर्ण शरीरालाच बनवलं दारूची टाकी

सडपातळ होतो जाडजूड! दारु तस्करीचा अनोखा प्रकार, पूर्ण शरीरालाच बनवलं दारूची टाकी

सकाळी जाताना सडपातळ असणारी व्यक्ती परत येताना मात्र जाडजुड होत असल्याचं पोलिसांना दिसलं आणि त्यांचा संशय बळावला.

सकाळी जाताना सडपातळ असणारी व्यक्ती परत येताना मात्र जाडजुड होत असल्याचं पोलिसांना दिसलं आणि त्यांचा संशय बळावला.

सकाळी जाताना सडपातळ असणारी व्यक्ती परत येताना मात्र जाडजुड होत असल्याचं पोलिसांना दिसलं आणि त्यांचा संशय बळावला.

पटना, 27 डिसेंबर: पूर्ण शरीर (Whole body) हेच दारूची टाकी (Tank of liquor) बनवून तस्करी करण्याचा नवा प्रकार बिहार पोलिसांनी (Bihar Police) हाणून पाडला आहे. बिहारमध्ये सध्या दारुबंदी (Ban on liquor) आहे. बिहारमध्ये जिथं जिथं दारु असल्याचा संशय येईल, तिथं पोलीस छापे (Raid) टाकून कारवाई करत आहेत. त्यामुळे दारूच्या तस्करीचा आणि काळ्या बाजाराचा धंदा सध्या तेजीत सुरु झाल्याचं चित्र दिसू लागलं आहे. त्यानुसार बिहारमधून उत्तर प्रदेशात जाताना बारीक दिसणारी व्यक्ती येताना मात्र जाडजुड दिसू लागली आहे. 

अशी होते चोरी

बिहारमधून सकाळच्या वेळी अनेक नागरिक बॉर्डर क्रॉस करून बिहारमध्ये जातात आणि संध्याकाळी परत येतात. या कामासाठी बारीक आणि सडपातळ बांधा असलेल्या व्यक्तींची निवड केली जाते. बिहारमधून युपीत जाताना या व्यक्ती सडपातळ दिसतात आणि संध्याकाळी पुन्हा बिहारमध्ये प्रवेश करताना मात्र जाडजूड दिसतात. त्यांच्या पोटाला आणि पाठिला सेलो टेप लावून दारूच्या बाटल्या चिकटवल्या जातात आणि त्यावरून त्यांना मोकळेढाकळे कपडे घालायला दिले जातात. त्यानंतर हळूवार हालचाल करत या व्यक्ती बिहारमध्ये जातात आणि तिथं दारूची चढ्या भावाने विक्री करत असल्याचं दिसून आलं आहे.

अशी उघड झाली चोरी

बिहारमध्ये गस्तीवर असणारे पोलीस शिफ्टमध्ये काम करतात. सकाळी ज्याची ड्युटी असते, तो दुपारनंतर नसतो आणि नवा कर्मचारी ड्युटीवर येतो. या शेड्युलचा फायदा घेत सकाळी काही व्यक्ती बिहारहून युपीत जायच्या आणि संध्याकाळी ड्युटी बदलली की परत यायच्या. त्यामुळे जाताना बारीक व्यक्ती येताना जाडजूड झाल्याचा फरक जाणवत नसे. एक दिवस मात्र सकाळपासून रात्रीपर्यंत ड्युटीवर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आली आणि त्याने त्या व्यक्तीची झडती घेतली. त्याच्याकडून दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. 

हे वाचा -

जाडजूड माणसाची होते झडती

त्यानंतर आता जाडजूड आणि ढगळ कपडे घाललेली व्यक्ती दिसली, की पोलीस त्याची चौकशी करतात. या प्रकारे आतापर्यंत अनेकांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून अवैधरित्या तस्करी केल्या जाणाऱ्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. 

First published:

Tags: Bihar, Illegal liquor, Smuggling