मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /एकापाठोपाठ 3 चिमुरड्यांवर बॅटरी वॉटरने हल्ला, यवतमाळमधील धक्कादायक घटना

एकापाठोपाठ 3 चिमुरड्यांवर बॅटरी वॉटरने हल्ला, यवतमाळमधील धक्कादायक घटना

 एक दुचाकीवर आलेल्या तरुणाने 5 वर्षांच्या मुलाच्या चेहऱ्यावर ज्वलनशील द्रव्याने हल्ला केला.

एक दुचाकीवर आलेल्या तरुणाने 5 वर्षांच्या मुलाच्या चेहऱ्यावर ज्वलनशील द्रव्याने हल्ला केला.

एक दुचाकीवर आलेल्या तरुणाने 5 वर्षांच्या मुलाच्या चेहऱ्यावर ज्वलनशील द्रव्याने हल्ला केला.

नरेंद्र मते, प्रतिनिधी

यवतमाळ, 27 डिसेंबर : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या वणी शहरात एका 5 वर्षीय चिमुकल्यावर ज्वलनशील द्रव्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  गेल्या तीन दिवसात चिमुकल्यावर अशा द्रव्य हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे, हे तिन्ही चिमुकले एकाच कुटुंबातील आहे. सततच्या हल्यामुळे मोमिनपुराच नाही तर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर सदर द्रव्य हे बॅटरी वॉटर (Battery water attack) असल्याचे समोर आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मोमिनपुरा परिसरात आज दुपारी 4.45 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. अशरखान इनायतखान (5) हा चिमुकला मोमिनपुरा येथील मस्जिद जवळ राहतो. तो आज सोमवारी दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी 4.45 वाजताच्या सुमारास घराजवळ खेळत होता.

एक व्यक्ती दुचाकीने आली व त्यातील एकाने अशरखानच्या चेहऱ्यावर ज्वलनशील द्रव्याने हल्ला केला. त्यानंतर तो तातडीने तिथून निघून गेला, अशी माहिती चिमुकल्याच्या कुटुंबीयांने दिली.  घटनेची माहिती मिळताच लोकांनी तिथे एकच गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची चमू देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचली होती.

(तू जिथं जाशील तिथं...', साखरपुड्यानंतर ऋता दुर्गुळेची प्रतीकसाठी खास पोस्ट)

तर, मोमीनपुरा परिसरात शफीउल्ला खान हे आपल्या परिवारासह राहतात. ते रोजमजुरीचे काम करतात. त्यांना एक मुलगा उझेब (8) व मुलगी अश्फानाझ (5) आहेत. शनिवारी त्यांच्या मुलावर व रविवारी त्यांच्या मुलीवर घराजवळ खेळत असताना असाच हल्ला करण्यात आला होता. पहिल्या घटनेच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले मात्र सलग दुसरा हल्ला झाल्याने त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. तपासणी केली असता सदर द्रव्य हे बॅटरी वॉटर असल्याचे समोर आले. या दोन घटनेनंतर खळबळ माजली असताना आज शफीउल्ला यांच्या लहान भावाच्या मुलावर हल्ला झाला.

(पृथ्वी आणि मंगळ यांसारखे ग्रह कसे तयार झाले? संशोधनात आधीच्या संकल्पनेला छेद)

या तिन्ही हल्ल्यात कोणतीही जखम झाली नसली तरी चेह-यावर जळजळ होत आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण मोमिनपुराच नव्हे तर संपूर्ण वणीमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सध्या या प्रकरणी सीसीटीव्हीची तपासणी सुरू आहे.

दरम्यान, पीडितांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले असून याबाबत तक्रार नोंदवणे सुरू आहे. नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

First published:
top videos

    Tags: Yavatmal