मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Mahad: महिला सरपंचाचा विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह, बलात्कार करुन हत्या केल्याचा संशय

Mahad: महिला सरपंचाचा विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह, बलात्कार करुन हत्या केल्याचा संशय

Woman Sarpanch found dead in Mahad Raigad: एका महिला सरपंचाचा जंगलात मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Woman Sarpanch found dead in Mahad Raigad: एका महिला सरपंचाचा जंगलात मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Woman Sarpanch found dead in Mahad Raigad: एका महिला सरपंचाचा जंगलात मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

महाड, 28 डिसेंबर : महाड तालुक्यातील (Mahad Taluka) एका गावच्या महिला सरपंचाचा मृतदेह जंगलात आढळून (Woman Sarpanch found dead in forest) आला आहे. तुडील भेलोशी रस्त्यालगत सोमवारी दुपारी जंगलात सदर महिला फाटी आणण्यासाठी गेली असता ही घटना घडली. गावातील एक तरुण महाडकडे येत असताना रस्त्यालगत फाट्यांची भारी पाहिली. मात्र कोणीही दिसले नाही म्हणून सदर तरुणाने परीसरात बघले असता रस्त्यालगत जंगल भागत सदर महिला मृतावस्थेत दिसून आली. (Woman sarpanch found dead in forest at Mahad)

अज्ञात इसमाने डोक्यात फाटा मारून त्यांचा खून केला असून मृतदेह विवस्त्र असल्याने अतीप्रसंग अगर बलात्काराचा संशय व्यक्त केला जात आहे. महाडचे पोलीस अधिक्षक, तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

वाचा : जेलमधून सुटताच नराधमाने गाठला विकृतीचा कळस, तरुणीसोबत केलेलं कृत्य वाचून हादराल

दरम्यान महिला सरपंचाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस विविध अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने बलात्कार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. त्या अँगलनेही पोलीस आपला तपास करत असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर बलात्कार झाला की नाही हे स्पष्ट होईल.

जळगावात नवविवाहितेसोबत दीर आणि सासऱ्याचं घृणास्पद कृत्य

जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका नवविवाहित महिलेकडे तिच्या दिराने शरीरसुखाची मागणी करत तिच्याशी अश्लील वर्तन केलं आहे. एवढंच नव्हे तर सासऱ्याने देखील महिलेला वाईट हेतूने स्पर्श केला आहे. या प्रकरणी दीर आणि सासऱ्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

वाचा : पियूष जैनचं कोट्यवधींचं घबाड, घराच्या या कोपऱ्यात लपवला होता खजिना

पीडित महिलेचं ऑगस्ट महिन्यात लग्न झालं असून ती जळगाव येथे आपल्या पतीसोबत राहते. तर तिचे सासरे आणि दीर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरीकडे राहतात. गेल्या तीन दिवसांपासून पीडित महिलेचा पती घरी आला नव्हता. पतीशी कोणताही संपर्क होत नसल्याने पीडित महिला आपल्या पतीबाबत विचारपूस करण्यासाठी सासरी गेली होती. शनिवारी सायंकाळी पीडित महिला आपल्या सासरी गेली असता, आरोपी दिराने तिच्याशी अश्लील वर्तन केलं.

First published:

Tags: Crime, Murder, Raigad, महाराष्ट्र