जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कर्नाटक निकालानंतर सिल्वर ओकवर घडामोडींना वेग; शरद पवारांनी बोलावली मविआची बैठक

कर्नाटक निकालानंतर सिल्वर ओकवर घडामोडींना वेग; शरद पवारांनी बोलावली मविआची बैठक

शरद पवारांनी बोलावली बैठक

शरद पवारांनी बोलावली बैठक

आज सिल्वर ओकवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 मे : मोठी बातमी समोर येत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीचे नेते अधिक सक्रिय झाले आहेत. आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही  बैठक बोलावली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर ही बैठक होणार आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडी पहाता या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. बैठकीत कशावर चर्चा?  आज होणाऱ्या बैठकीमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही बैठक बोलावली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या या विजयानं विरोधकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. पुढील वर्षी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका एकत्र लढण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडीचा विचार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजची बैठक बोलावण्यात आली आहे. कर्नाटक विजयावर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले; राहुल गांधींचं कौतुक, भाजपच्या डोळ्यात झणझणीत अंजन आदित्य ठाकरे केजरीवालांच्या भेटीला  दरम्यान दोनच दिवसांपूर्वी  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी आज अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. त्यापूर्वी अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी आपल्या या दौऱ्यात उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. ठाकरे आणि केजरीवाल यांच्या वाढत्या जवळकीची आता जोरदार चर्चा सुरू झाली  आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात