मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /NCB गुन्हेगारांना कसं काय नियुक्त करते? शरद पवारांचाही जोरदार हल्लाबोल

NCB गुन्हेगारांना कसं काय नियुक्त करते? शरद पवारांचाही जोरदार हल्लाबोल

 'एकीकडे ईडी आणि आयकर विभागासारख्या यंत्रणाचा वापर केला जात आहे. आता  एनसीबीकडूनही असेच प्रकार सुरू आहे.

'एकीकडे ईडी आणि आयकर विभागासारख्या यंत्रणाचा वापर केला जात आहे. आता एनसीबीकडूनही असेच प्रकार सुरू आहे.

'एकीकडे ईडी आणि आयकर विभागासारख्या यंत्रणाचा वापर केला जात आहे. आता एनसीबीकडूनही असेच प्रकार सुरू आहे.

पुणे, 16 ऑक्टोबर : आर्यन खान अटक प्रकरणावरून  (aryan khan arrest case) राष्ट्रवादीचे (ncb) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबीवर (ncb) एकपाठोपाठ गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनीही 'एनसीबी एखाद्या कारवाईमध्ये गुन्हेगाराला पंच म्हणून कसं काय नियुक्त करू शकते' असा सवाल करत हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी एनसीबीने केलेल्या कारवाईवरून प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आणि नवाब मलिक यांचीही जोरदार पाठराखण केली.

'एकीकडे ईडी आणि आयकर विभागासारख्या यंत्रणाचा वापर केला जात आहे. आता  एनसीबीकडूनही असेच प्रकार सुरू आहे. नवाब मलिक यांच्या जावयाला अटक करण्यात आली. नवाब मलिक यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. सुदैवाने त्यांना जामीन मिळाला. कोर्टाच्या निष्कर्षात तो गांजा नव्हताच हा रिपोर्ट दिला. थोडक्यात एनसीबी त्यांना अकारण 6 महिने डांबून ठेवलं होतं, असं म्हणत पवारांनी मलिक यांची बाजू मांडली.

तुमची मुलं डिप्रेशनमध्ये आहेत का? त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जावं का? वाचा

'आता पुन्हा एकदा एनसीबीकडून एक कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणात पार्टी मलिक यांनी एका व्यक्तीचं नाव घेतलं. तो पंच हा गुन्हेगार निघाला आहे. मलिक यांनी आरोप केल्यानंतर तो व्यक्त कोणत्याही यंत्रणेला सापडला नाही.  एनसीबीचा पंच किरण गोसावी आता का गायब आहे. माझ्या वाचण्यात आलंय, गोसावीचं अटक वारंट पुणे पोलिसांनी काढलंय. एनसीबी गुन्हेगारांना पंच म्हणून कसं काय नियुक्त करते? असा खडा सवाल पवारांनी उपस्थितीत केला.

जे सरकार केंद्र सरकारच्या विचारचं नाही, त्या सरकारवर दबाव टाकण्याचं काम केलं जात आहे. विरोधी विचारांच्या राज्य सरकारांना केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून अस्थिर केलं जातं आहे. ईडी ही दोन वर्षांपूर्वी कुणाला माहिती नव्हती. पण आता राजकीय दबाब टाकण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे, अनेकांना समन्स बजावल्या जात आहे, असंही पवार म्हणाले.

'अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी तब्बल 5 दिवस छापे मारले. मध्यमवर्गीय घरात इतके दिवस छापे टाकायला लावले. त्यांना पुढचा आदेश येईपर्यंत दबाव टाकून 5-5 दिवस छापे टाकायला लावले गेले, हे बरोबर नाही. दोन दिवस पाहुणे ठिक असतात पण आठ दिवस पाहुणे राहायला लागले तर वैताग येतो. अधिकाऱ्यांना वरून फोन यायचा. त्यानंतर ते मुक्काम वाढवून होते, असा धक्कादायक खुलासा पवार यांनी केला.

'Chala Hawa Yeu Dya' शोला या अभिनेत्याचा रामराम; दिसणार हिंदी कार्यक्रमात

'मुळात या प्रकरणात खुलासा करायला भाजपचे नेते पुढे येतात. माजी मुख्यमंत्री येतात. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष येतात. शासकीय यंत्रणेशी कामाशी काही तक्रार असेल तर त्या संबंधीत मंत्र्याने बोललं तर मी समजू शकतो. पण, हे नेतेही तिथे येऊन बोलायचे.  महाराष्ट्रातील सरकार हे दोन दिवस टिकणार नाही, असं सांगत होते. ते पुन्हा पुन्हा मी येणारच असं सांगत होते. पण त्यांचं काही जमेना त्यामुळे अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून राजकीय आकसाने या चौकशा सुरू झाल्या आहे' अशी टीकाही पवारांनी केली.

Gold Price: ₹48,000 पेक्षा कमी झाले सोन्याचे दर, आता गुंतवणुकीची योग्य संधी?

एक जुने भाजपचे नेते आणि त्यांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेले एकनाथ खडसे आहे. फडणवीस यांनी त्यांच्या हाताखाली काम केलं होतं. खडसे राष्ट्रवादीत आले. २० वर्षांपेक्षा जास्त ते भाजपचे नेते होते. २० वर्षांपासून जास्त पक्षाचे काम करणारे भाजपचे नेते होते. राष्ट्रवादीत आल्यानंतर भाजपकडून लगेच खटले सुरू झाले. त्यांच्या जावयावर गुन्हे दाखल केले गेले. त्यांच्या पत्नीचाही उल्लेख केला गेला. सुदैवाने खडसे यांचा संबंध नाही, हे कोर्टात दिसून आलं आहे. पक्ष सोडला की लगेच कारवाई केली जात आहे, कुटुंबाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहे' असं म्हणत पवार यांनी खडसेंची पाठराखण करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

First published:

Tags: शरद पवार