मुंबई , 16 ऑक्टोबर : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ ( chala hawa yeu dya ) सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचे असंख्य चाहते आते. या कलाकारांचा अभिनय त्यांचा कॉमेडी सेन्स प्रेक्षकांना खळखळून हसवतो. मागच्या काही दिवसापासून मात्र यातील एक कलाकार एपिसोडमध्ये गैरहजर दिसत आहे. या कलाकाराने (krishna ghonge ) हा शो सोडला की काय अशी चर्चा रंगली आहे. हा कलाकार शोमध्ये का दिसत नाही याचे कारण नुकतच समोर आले आहे. चला हवा येऊ द्या मधील गुंठामंत्री म्हणून ओळख मिळवलेला पुण्यातील राजगुरूनगरचा कृष्णा घोंगे हा कलाकार मागचे दोन ते तीन आठवडे शोमध्ये पाहायला मिळालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्याने शो सोडला की काय अशी चर्चा रंगली आहे. आता मात्र यामागचे खरं कारण समोर आलं आहे. नुकताच त्याने एक फोटो शेअर करत आपण सध्या काय करत आहोत याची सर्व प्रेक्षकांना कल्पना दिली आहे.
कृष्णा घोंगे यांनी त्याच्या इन्स्टावर प्रतीक गांधी सोबत ‘रिस्क है तो ईश्क है’ म्हणत त्याने एक फोटो शेअर केला आहे. कृष्णा घोंगे आता झीच्या हिंदी मालिकेत झळकणार आहे. कृष्णा झी कॉमेडी शोचा एक भाग बनला आहे. प्रतीक गांधी झी कॉमेडी शोमध्ये आला होता तेव्हा त्याने त्याच्यासोबत हा फोटो काढला आहे. कृष्णा आता हिंदी मालिकेत गेल्यामुळे तो चला हवा येऊ द्याच्या मंचावर दिसणार नाही. वाचा : बापरे! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची अवस्था झाली भयंकर; PHOTO शेअर करत म्हणाली, ‘माझ्यासाठी प्रार्थना करा’ सर्वसामान्य घऱातील कृष्णा घोंगे चला हवा येऊ द्या मुळे कमी काळातच सर्वांच्या आवडीचा कलाकार बनला. कृष्णा घोंगे हा मूळचा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुडे बुद्रुक या गावचा आहे. कृष्णाचे वडील भागूजी घोंगे हे शेतमजुरी करायचे यासोबतच ते छत्र्या दुरुस्त करणे, गवंडी काम करणे अशी मिळेल ती छोटी मोठी कामे करत असे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती. वाचा : …ते सेलिब्रिटी जे अजूनही The Kapil Sharma Show मध्ये गेले नाहीत; काय आहेत कारणं…पाहा PHOTOS कृष्णाने नोकरी करत असताना एक आवड म्हणून फिल्ममेकिंगचे धडे गिरवले. पण आपल्या रांगड्या भाषेमुळे त्याला अनेक ठिकाणी नकार मिळाला. मग स्वतःच शॉर्टफिल्म बनवायला सुरवात केली त्यात त्याला अनेक पारितोषिके देखील मिळाली. पुढे निलेश साबळेशी ओळख झाली आणि निलेशच्या असिस्टंट म्हणून त्याला काम मिळाले. त्यानंतर चला हवा येऊ द्या कार्यक्रमात काही भूमिका साकारून कृष्णाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.