मुंबई, 16 ऑक्टोबर: सध्या सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे सहाजिकच अनेकजण सोनेखरेदीला पसंती देतात. तुम्ही देखील सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोनेखरेदीआधी सोन्याचा लेटेस्ट भाव (Latest Gold Price) जाणून घेणे आवश्यक आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (Gold Rate on MCX) वर आज सोन्याची किंमत सुमारे 47,300 रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. याआधी काल सोन्याचा दर प्रति तोळा 48,000 रुपयांवर पोहोचला होता. कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याच्या दरातील ही घसरण प्रॉफिट बुकिंगमुळे आली आहे आणि एकूणच या मौल्यवान धातूबद्दल बाजारामध्ये सकारात्मक सेंटिमेंट आहे. शिवाय कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणारी महागाई आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमकुवतता- या दोन मोठ्या कारणामुळे पुढील महिन्यात सोन्याचे भाव वाढतच राहण्याची शक्यता आहे.
वाचा-Adani Group च्या या कंपनीचा IPO येणार, SEBI ने दिली मंजुरी; कमाईची सुवर्णसंधी!
आताच करा गुंतवणूक
कमोडिटी बाजाराच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला $ 1720 प्रति औंस वर मजबूत समर्थन आहे, याचा अर्थ असा की सोन्याची किंमत या खाली जाणे खूप कठीण होईल. त्यांनी अशी माहिती दिली की, अल्पावधीतच सोन्याची किंमत 1800 डॉलर प्रति औंसपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.
कमोडिटी एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, जर तुम्ही आणखी एक महिन्याचा वेळ घेतला तर सोन्याचे दर $1850 प्रति औंसच्या पातळीवर जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यानंतर त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील किंमतीवर देखील होतो. त्यांनी सोन्याच्या गुंतवणूकदारांना सल्ला दिला की ते सध्याच्या 47,300 रुपये प्रति तोळाच्या किंमतीवर सोने खरेदी करू शकतात. तसंच 46,900 रुपयांच्या पातळीपर्यंत प्रत्येक घसरणीत अधिक खरेदी करू शकतात.
वाचा-खूशखबर! BoB देतेय स्वस्त प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी; मिळवा तुमच्या हक्काचं घर
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार आणखी एका तज्ज्ञाने अशी माहिती दिली की, "यूएस फेडने अजून सांगितले नाही की ते व्याजदर कधी वाढवतील. हा निर्णय देखील सोन्याच्या बाजूने आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदार सध्याच्या पातळीवर सोने खरेदी करू शकतात. एमसीएक्सवर सोन्याचे भाव वाढण्याची अपेक्षा आहे. पुढील एका महिन्यात 49,600 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतात.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today