तुमची मुलं चिंताग्रस्त आहेत? मुलाला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेलं पाहिजे? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

तुमची मुलं चिंताग्रस्त आहेत? मुलाला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेलं पाहिजे? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मानसोपचारतज्ज्ञ हे पालकांकडून मुलाबद्दल माहिती घेतात. त्यामध्ये मेडिकल हिस्ट्री, शारीरिक आणि भावनिक ट्रॉमा हिस्ट्री, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची फॅमिलीची हिस्ट्री, मुलाच्या विकासाबाबत माहिती, शैक्षणिक हिस्ट्री आदींचा समावेश असतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : तुमची मुले चिंताग्रस्त आहेत का? त्यांच्या वागण्या-बोलण्यात बदल होतोय का? मुलांच्या वागणुकीत काही बदल जाणवत आहे का? या प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण तुमच्या मुलांना मानसिक आरोग्याचा त्रास (Mental health problems ) होऊ शकतो. यासाठी मुलांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं असून आवश्यकता पडल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा (Psychiatrists) सल्ला घेणं गरजेचं आहे.

आज तक ने याबाबत वृत्त दिलं आहे. बऱ्याचदा पालकांसाठी (parents) मुलांचं मानसिक आरोग्य समजून घेणं एक कठीण काम बनतं. मुलांमध्ये वाढती चिंता, दुःख किंवा उदासीनता असो, त्यांच्यामध्ये वयानुसार होणारे बदल, या सर्वांवर पालक योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. काही पालक, आपल्या मुलाला समजून घेण्याऐवजी त्याला थेट डॉक्टर किंवा समुपदेशक (counsellor) यांच्याकडे नेतात. तर, बरेच पालक मुलांना घेऊन मानसोपचारतज्ज्ञांकडे जायचे की नाही, हे ठरवू शकत नाहीत. मुलांना कधी मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकाकडे नेलं पाहिजे, त्यांच्या कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, हे आज तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.

आयएचबीएएस (Institute of Human Behavior and Allied Sciences) चे वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश यांच्या मते, ‘तुम्हाला जर तुमच्या मुलाच्या मानसिक आरोग्याबद्दल काळजी वाटत असेल, तर सर्वात प्रथम नेमका याचा शोध घ्या की मुलाच्या कोणत्या सवयीची तुम्हाला चिंता वाटत आहे. तसेच तुमच्या मुलाच्या शिक्षकांशी, जवळच्या मित्रांशी, नातेवाईकांशी बोला आणि त्यांनाही तुमच्या मुलाच्या वागण्यात बदल दिसतोय का, याची माहिती घ्या. मुलाच्या वागण्यात झालेले बदल खरोखर चिंताजनक वाटत असतील तर ही माहिती तुमच्या मुलाच्या डॉक्टरांशी शेअर करा.

वाचा : गरम पाण्याचे फायदे सर्वांनाच माहिताहेत; त्यात या गोष्टी घालून पिणं ठरेल अधिक गुणकारी 

मुलांच्या मानसिक आजाराची लक्षणं

मूल जास्त काळापासून उदास असणे, संवाद करण्यास टाळाटाळ करणं, स्वतःला दुखापत करणं किंवा दुखापत करून घेण्याबाबत बोलणं, मृत्यू किंवा आत्महत्येबद्दल बोलणं, घरात तोडफोड करणं किंवा अत्यंत चिडचिड करणे, छोटछोट्या गोष्टींवरून वागणुकीत बदल होणे, मूड, वागणूक किंवा व्यक्तिमत्त्वात तीव्र बदल होणे, खाण्याच्या सवयींमध्ये बदल होणे, वजन कमी होणे किंवा कमी किंवा जास्त झोपणे, डोकेदुखी किंवा पोटात दुखण्याची वारंवार तक्रार, तुमच्याशी बोलताना लक्ष कमी देणे, शैक्षणिक कामगिरीमध्ये अचानक बदल होणे, शाळेत जाणे टाळणे किंवा निष्काळजीपणे वागणे.

मानसोपचारतज्ज्ञ हे मुलांच्या मानसिक आरोग्य स्थितीचे निदान आणि उपचार हे मुलांमधील लक्षणांच्या आधारे करतात. डॉक्टर हे पाहतात की, ही स्थिती मुलाच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करते.

वाचा : HUNGER INDEX: भारतातील भूक आणि कुपोषणात वाढ, पाकिस्तानपेक्षाही वाईट अवस्था; वाचा सविस्तर

मानसोपचारतज्ज्ञ हे पालकांकडून मुलाबद्दल माहिती घेतात. त्यामध्ये मेडिकल हिस्ट्री, शारीरिक आणि भावनिक ट्रॉमा हिस्ट्री, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची फॅमिलीची हिस्ट्री, मुलाच्या विकासाबाबत माहिती, शैक्षणिक हिस्ट्री आदींचा समावेश असतो. तसेच मुलांच्या लक्षणांबद्दल पालकांशी बोलणे, पालकांसोबत व मुलासोबत संवाद यावरही मानसोपचारतज्ज्ञ भर देतात.

पालक म्हणून काय कराल?

सर्वप्रथम, पालकांनी मुलाच्या समस्येबद्दल जाणून घ्यावे. कौटुंबिक समुपदेशन करावे आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच उपचार सुरु करावेत. तुमच्या मुलाने तुम्हाला कसा प्रतिसाद द्यावा, यासंबंधी तुमच्या मुलाच्या मानसिक आरोग्यावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या. पालकत्व प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये नोंदणी करा. आपल्या मुलांबरोबर आराम करण्यासोबतच त्यांच्यासोबत मज्जा करण्याचे मार्ग शोधा. आपल्या मुलाच्या सामर्थ्याची आणि क्षमतेची स्तुती करा. तुमच्या मुलाच्या शाळेबरोबर काम करा.

तुमचा मुलाला मानसिक आजाराचा त्रास तर होत नाही ना, हे त्याच्या वागण्यात होणाऱ्या काही बदलावरून लक्षात येऊ शकते. अशावेळी मुलांकडे वेळेची लक्ष देणे गरजेचे असते.

First published: October 16, 2021, 3:57 PM IST

ताज्या बातम्या