मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'अन्याय होत असेल तर कोर्टात जा, कोणताच गुन्हा..', गुलाबराव पाटलांचं एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर

'अन्याय होत असेल तर कोर्टात जा, कोणताच गुन्हा..', गुलाबराव पाटलांचं एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर

फाईल फोटो

फाईल फोटो

एकनाथ खडसे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, की 'कोणताही गुन्हा खोटा दाखल होत नसतो, पोलीस चौकशी करूनच गुन्हा दाखल करतात.'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

जळगाव 17 ऑक्टोबर : खोटा गुन्हा दाखल करून आपल्याला अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा धक्कादायक आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, की 'कोणताही गुन्हा हा खोटा दाखल होत नसतो. अन्याय होत असेल तर एकनाथ खडसे यांनी कोर्टात जावं', असा सल्लाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी खडसेंना दिला आहे.

...म्हणून अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिंदे गटाने उमेदवार दिला नाही, उदय सामंतांनी सांगितलं कारण

एकनाथ खडसे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, की 'कोणताही गुन्हा खोटा दाखल होत नसतो, पोलीस चौकशी करूनच गुन्हा दाखल करतात. जे होत आहे ते पाहावं. अन्याय होत असेल तर आपल्यासाठी कोर्ट आहे, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उत्तर दिलं आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला पत्र दिलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, की या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्षाचा आहे. या मागणीवर काहीही मत देणं त्यांनी टाळलं आहे.

ठाकरेंनंतर शिंदेंचं पुढचं टार्गेट पवार, 'राष्ट्रवादी'चा पेपर आधीच फोडला!

शिंदे गटाकडून धमक्या दिला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे समर्थकांनी जळगावातील एका मेळाव्यात केला होता. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की 'कोणी धमकी दिली हे जाहीर करावं, वाऱ्याला लाथा मारू नये. माझा धंदा हा लोकांची कामे करण्याचा आहे, धमकी देण्याचा नाही. जे काम करत नाही ते अशाच पद्धतीने उलट्या गोष्टी करतात. त्यांनी काम करावं आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये.' जळगावात एका भूमिपूजन सोहळ्यासाठी आले असता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

First published:

Tags: Eknath khadse, Gulabrao patil