जळगाव 1 सप्टेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये होत असलेल्या पक्ष प्रवेशावर आपल्याच नेत्यांना घरचा अहेर दिला. सध्या भाजपमध्ये इतर पक्षातल्या नेत्यांची प्रवेशासाठी रांग लागलीय. त्यामुळे त्याला मेगाभरती असंही म्हटलं जातं. त्यावरच खडसेंनी टोलेबाजी केलीय. ते म्हणाले, भाजपमध्ये येणारे सगळेच नेते हे काही साधुसंत नाहीत. प्रत्येकाही काहीतरी पाहिजे आहे. कुणी सत्तेच्या संरक्षणासाठी, कुणी पदासाठी तर कुणी अन्य कारणांसाठी भाजपमध्ये येत आहेत. राजकारणात हे घडतच असतं. पण भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी प्रत्येकाची स्वच्छता केली जाते. मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर असून येणाऱ्या लोकांना पवित्र केलं जातं असंही ते म्हणाले. खडसेंचा रोख हा मुख्यमंत्र्यांवरच आहे असं आता बोललं जातंय. खडसेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरही टीका केली. ते म्हणाले, शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं. त्यांनी यशवंतराव चव्हाणांची साथ सोडून वेगळा पक्ष तयार केला. त्यांनी इतर पक्षांमधल्या अनेकांना आपल्या पक्षात ओढून आणलं. आता तीच परिस्थिती त्यांच्यावरच उलटलीय असं मतही त्यांनी व्यक्त केलं. शतक केल्यानंतर भावुक झाला हनुमा विहारी, कारण होतं 12 वर्षांपूर्वीच दु:ख! ‘समुद्रात नाव बुडताना उंदीर उडी मारतात तशी ‘राष्ट्रवादी’ची स्थिती’ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजप आणि शिवसेनेत जाण्यासाठी रांग लागलीय. नेत्यांच्या या पक्षांतरावर ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी सडकून टीका केलीय. ते म्हणाले, ज्यांच्या भानगडी आहेत, ज्यांचे घोटाळे आहेत, त्यांचे घोंगडे अडकले आहे. त्यावर पांघरून घालण्याकरताच नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत अशी टीका त्यांनी केलीय. भाजपाच्या गंगेत डुबकी मारून पवित्र होऊ असा या नेत्यांचा समज आहे. मात्र ती गंगाच मलिन झालेली आहे. अशी टीकाही आडम यांनी केलीय. समुद्रात नाव बुडताना उंदीर उडी मारतात तशी गत राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे असा टोलाही त्यांनी लगावला. अक्षय कुमारला भेटण्यासाठी 18 दिवसांत तो चालला 900 किलोमीटरचं अंतर! आडम पुढे म्हणाले, देशात आर्थिक बेरोजगारी आणि बेकारी वाढत आहे, कामगारांवर उपासमारीची वेळ येतेय, देशात 34 कोटी लोकांना फक्त एकाच वेळचं जेवणं मिळतं. पारले बिस्कीट कंपनी मधील कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली, शस्त्राअस्त्र बनवणाऱ्या कंपनी मधील कामगार कमी केली जात आहेत.
कोण बाकी राहिलं आता.. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला ‘शोध यात्रा’ म्हटलं प हिजे
सरकारशी भांडून रक्त सांडून कामगारांसाठी कायदे केले गेले मात्र आज त्याच कायद्याची पायमल्ली होत आहे. खचून न जाता देशाच्या एकूण परिस्थितीला बदलण्यासाठी व्यवस्थे विरोधात बंड पुकारण्यासाठी, दोन हात करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असं आवाहनही त्यांनी केलं.