मुंबई, 1 सप्टेंबर : बॉलिवूड कलाकरांची मोठी फॅनफॉलोइंग लिस्ट असणं आपल्यासाठी नवीन नाही. मात्र अनेकदा बॉलिवूड कलाकरांना त्यांच्या चाहत्यांबाबत अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. ज्यांचा त्यांनी विचारही केलेला नसतो. काही चाहत्यांचं वेड्यासारखं प्रेम पाहून हे कलाकार भारावून जातात. आज असंच काहीसं अभिनेता अक्षय कुमारसोबत घडलं. त्याचा असाच एक क्रेझी चाहता त्याला भेटयला मुंबईला आला. अक्षयच्या या क्रेझी चाहत्याचं नाव आहे प्रभात. मात्र तो अक्षयसाठी खास का ठरला याची एक वेगळीच कथा आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अक्षय कुमारनं त्याच्या इन्स्टग्राम अकाउंटवर आज सकाळीच एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तो त्याचा चाहता प्रभातशी बोलताना दिसत आहे. प्रभातनं अक्षयला भेटण्यासाठी 900 किलोमीटरचं अंतर 18 दिवसांत चालत पार केलं आहे. त्यानं अक्षयला सांगितलं की, तो रोज 50 किलोमीटर चालत होता. त्यानं स्वतःच पायी चालत मुंबईला येण्याचा निश्चय केला होता. कारण त्याला अक्षय कुमारसारखं सर्वांना प्रेरित कारायचं होतं. रोज चालणं महत्त्व त्याला सर्वांना पटवून द्यायचं होतं. त्यामुळे त्यानं असं अनोख्या पद्धतीनं अक्षयला भेटायचं ठरवलं.
पोटावरील स्ट्रेचमार्क्समुळे ट्रोल करणाऱ्यांना झरीन खाननं दिलं सडेतोड उत्तर
अक्षय त्याला विचारतो तुला कसं माहित की मी रविवारी घरी असतो. त्यावर प्रभात म्हणाला, ‘मी तुमचा चाहता आहे सर त्यामुळे तुमच्याबद्दल मला सर्व काही माहित असतं. रविवारी तुम्हाला भेटायचं म्हणून मी शनिवारी रात्री सुद्धा चाललो. पाऊस होता मी भिजलो होतो मात्र मला तुमची भेट घ्यायचीच होती.’ मात्र यावर अक्षय त्याला असं न करण्याचा सल्ला देतो. सध्या रोडवर ट्राफिक असतं फिटनेस वगैरे ठीक आहे पण जीवावर बेतेल असं पुन्हा काही करू नको असं अक्षयनं त्याला समजावलं.
बॉलिवूड डेब्यूनंतर आता रानू मंडल यांच्या जीवनावर होणार सिनेमाची निर्मिती?
अक्षयनं त्याच्या या जबरा चाहत्याचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, ‘मी अशा प्रकारच्या भेटीसाठी नेहमीत कृतज्ञ आहे. मात्र जीवावर बेततील अशा गोष्टी करू नका. तुमचा वेळ, एनर्जी आणि लाइफ चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. या सर्व गोष्टी मला खूप आनंद देतात. प्रभात तुला खूप साऱ्या शुभेच्छा.’
सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी सिनेमा ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमात अभिनेत्री कियारा अडवाणी त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला त्याचा ‘मिशन मंगल’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
अॅमी जॅक्सननं शेअर केले बेबी शॉवर PHOTO, ब्लू कलर थीम ठेवण्यामागे आहे 'हे' कारण
===========================================================
नाशिक मार्गावर कार-दुचाकीची धडक, बर्निंग बाईकचा थरारक VIDEO