जमैका, 01 सप्टेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं मजबूत पकड मिळवली आहे. हनुमा विहारीच्या शतकानंतर बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत पोहचला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीजच्या पहिल्या डावात 7 बाद 87 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या कसोटी सामन्यात हनुमा विहारीनं कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक केले. विहारीनं या सामन्यात पहिल्या डावात 111 धावा केल्या. विहारीनं इशांत शर्मासोबत 8व्या विकेटसाठी तबब्ल 112 धावांची शतकी भागिदारी केली. दरम्यान सामन्यानंतर विहारीनं आपली शतकी खेळी बाबांनी समर्पित केली तसेच, इशांत शर्माचेही आभार मानले. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 416 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विंडीजच्या फलंदाजीला बुमराहनं खिंडार पाडलं. त्यानं 9.1 षटकांत फक्त 16 धावा देत 6 फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्यासमोर एकही फलंदाज टिकू शकला नाही. बुमराहशिवाय मोहम्मद शमीने एक गडी बाद केला. त्याने 8 षटकांत 19 धावा दिल्या. विंडीजचा सलामीवीर ब्रेथवेट 10 धावा, हेटमायर, 34 धावा तर कर्णधार जेसन होल्डर 18 धावा करू शकले. यांच्याशिवाय इतर एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. वाचा- बुमराहच्या हॅट्ट्रिकचा खरा हिरो ठरला विराट! एका निर्णयानं घडला इतिहास सामन्यानंतर विहारीनं इशांत शर्माचे कौतुक करत त्याचे आभारही मानले. तसेच 25 वर्षीय विहारीनं, “जेव्हा मी 12 वर्षांचा होतो तेव्हा माझे वडील दिवंगत झाले. तेव्हाच मी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं माझ्या शतकामागे त्यांचा मोठा हात आहे. म्हणून मी हे शतक त्यांना समर्पित करतो”, असे मत व्यक्त केले.
वाचा- शमीमुळे बदललं बुमराहचं आयुष्य, धोनीनं केली होती मोठी भविष्यवाणी! ‘इशांत शर्माचे कौतुक करावे तेवढे थोडे’ तसेच, सामन्यानंतर विहारीनं इशांत शर्माचे कौतुक केले. “माझ्या पहिल्या शतकी खेळीमुळं मी खुश आहे. पण त्याचे खरे श्रेय इशांत शर्माला जाते. एक फलंदाज म्हणून त्यानं माझ्याहून चांगली कामगिरी केली. ज्याप्रमाणे इशांत शर्मा खेळत होता, त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आम्ही सतत गोलंदाजाच्या डोक्यात काय चालू असावे, याबाबत चर्चा करत होतो. त्याचा अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला”, असे मत विहारीनं व्यक्त केले. ‘रात्रभर होतो जागा’ पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विहारी आणि ऋषभ पंत यांनी भारताची बाजू सांभाळली. मात्र दुसऱ्या दिवशी पहिल्याच चेंडूवर पंत बाद झाला. त्यानंतर विहारीवर फलंदाजीची जबाबदारी आहे. यावेळी विहारीनं, “पहिल्या दिवशी मी 42 धावा केल्या. त्यामुळं मला रात्रभर चांगली झोप लागली नाही. मला मोठी धावसंख्या उभारायची होती. मला आनंद आहे की मी ते करू शकलो. त्याचबरोबर या शतकामुळेही खुश आहे”, असे सांगितले. वाचा- IND vs WI इतिहास रचण्यापूर्वी बुमराहच्या नावावर नकोसा विक्रम! VIDEO: महिला बस चालकाचा इंगा! मुलींना छेडणाऱ्याला फिल्मी स्टाईलनं मारहाण