जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 12 तासांमध्ये बदललं राज्याचं राजकारण, आता पुढे काय होणार? वाचा 5 महत्त्वाचे मुद्दे

12 तासांमध्ये बदललं राज्याचं राजकारण, आता पुढे काय होणार? वाचा 5 महत्त्वाचे मुद्दे

12 तासांमध्ये बदललं राज्याचं राजकारण, आता पुढे काय होणार? वाचा 5 महत्त्वाचे मुद्दे

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर (MLC Election) अवघ्या 12 तासांमध्ये राज्याचं राजकारण संपूर्ण बदललं आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जून : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर (MLC Election) अवघ्या 12 तासांमध्ये राज्याचं राजकारण संपूर्ण बदललं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज आहेत. शिंदे यांच्यासोबत 11 आमदार गुजरातमधील सुरतमध्ये असल्याची माहिती मंगळवारी सकाळी उघड झाली. मात्र शिवसेनेचे 30 ते 35 आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत, अशी नवी माहिती उघड झाल्यानं ठाकरे सरकार चांगलंच संकटात सापडलं आहे. राज्यातील राजकारणातील पुढील काही तास महत्त्वाचे आहेत. आता राज्यात पुढे काय होईल हे पाहूया 1) एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आमदारांचा मोठा गट आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे, असा दावा भाजपा करू शकते. भाजपाकडून विधानसभेत अविश्वासदर्शक ठराव दाखल केला जाऊ शकतो 2) भाजपाने बहुमत सिद्ध करण्याची मागणी केल्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देतील 3) उद्धव ठाकरे यांच्या सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल. विधानसभेत बहुमत सिद्ध झाले तर ठाकरे सरकारवरील संकट दूर होईल 4) विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सरकारला अपयश आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल 5) उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यास भारतीय जनता पक्षाकडून सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करेल शिवसेनेतील नाराज आमदारांची संख्या वाढली, शिंदे करणार मोठा भूकंप! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री? भाजपने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र शिंदे हे आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दुपारी पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात