जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : शिवसेनेतील नाराज आमदारांची संख्या वाढली, शिंदे करणार मोठा भूकंप!

BREAKING : शिवसेनेतील नाराज आमदारांची संख्या वाढली, शिंदे करणार मोठा भूकंप!

BREAKING : शिवसेनेतील नाराज आमदारांची संख्या वाढली, शिंदे करणार मोठा भूकंप!

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत 11 आमदार सूरतमध्ये असल्याची माहिती सुरूवातीला आली होती. मात्र नाराज आमदारांची संख्या मोठी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 21 जून : विधान परिषद निवडणूक (MLC Election Result) निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) सरकार संकटात आलं आहे. ठाकरे सरकारला शिवसेना नेते एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्याकडूनच आव्हान मिळालं आहे. शिंदे यांच्यासोबत 11 आमदार सूरतमध्ये असल्याची माहिती सुरूवातीला आली होती. मात्र नाराज आमदारांची संख्या मोठी आहे. शिवसेनेचे 30 ते 35 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती शिवसेनेच्या एका नेत्यानं न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे. उस्मानाबादेतील शिवसेनेचे उमरगा लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल आहे. आमदार चौगुले हे गेली 3 टर्म सलग सेनेचे आमदार असून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणून ओळख जातात.  सलग 3 वेळा आमदार असतानाही मंत्रिपद न मिळाल्याने चौगुले नाराज होते.चौगुले यांचे दोन्ही नंबर बंद आहेत. बुलडाण्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमूलकर आणि बुलडाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड नॉट रिचेबल आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार संजय नॉट रिचेबल आहेत.  एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकणमधील २ आमदार सोबत आहे. ठाण्यातील 2 आमदार सोबत आहे, अशी माहिती समोर आली आहे. शिवसेनापाठोपाठ काँग्रेसमध्ये भूकंप, बाळासाहेब थोरात राजीनामा देण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे दुपारी पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात