मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रत्नागिरीत शिवसेना VS शिवसेना; बॅनरवरुन दोन गटातील वाद चिघळणार? मोठा पोलीस बंदोबस्त

रत्नागिरीत शिवसेना VS शिवसेना; बॅनरवरुन दोन गटातील वाद चिघळणार? मोठा पोलीस बंदोबस्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे चिपळूणमधील बॅनर दुसऱ्या गटाने रातोरात काढून टाकले आहेत. याच मुद्द्यावरुन शिवसेनेच्याच दोन गटात वाद चिघळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे चिपळूणमधील बॅनर दुसऱ्या गटाने रातोरात काढून टाकले आहेत. याच मुद्द्यावरुन शिवसेनेच्याच दोन गटात वाद चिघळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे चिपळूणमधील बॅनर दुसऱ्या गटाने रातोरात काढून टाकले आहेत. याच मुद्द्यावरुन शिवसेनेच्याच दोन गटात वाद चिघळण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ratnagiri, India

रत्नागिरी 23 जुलै : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप आला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपनं राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र यादरम्यान उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात म्हणजेच शिवसेनेतच वादाला सुरुवात झाली.

BREAKING : खरी शिवसेना कोणाची? आता निवडणूक आयोग करणार फैसला, दोन्ही गटांना महत्त्वाचे आदेश

बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांकडून वारंवार सडकून टीका केली जात आहे. अशात आता आणखी एक बातमी रत्नागिरीमधून समोर आली आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे चिपळूणमधील बॅनर दुसऱ्या गटाने रातोरात काढून टाकले आहेत. याच मुद्द्यावरुन शिवसेनेच्याच दोन गटात वाद चिघळण्याची शक्यता आहे.

महापुरात मदत केल्याबद्दल चिपळूण शहरासह प्रभागवार लावलेल्या आभार बॅनरवरून चिपळूणमध्ये दोन गटात राजकीय संघर्ष पेटला आहे. रात्री शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. संबंधित बॅनर हे शहराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी लावले होते. हे बॅनर उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांनी काढून टाकले. यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde : पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला आहे. आपण शिवसेनेत असून बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने विधानसभा-लोकसभेतील गटनेते ते प्रतोद आपलेच असल्याचा दावा केला आहे. या गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाणा निशाण्यावरही दावा केला आहे. दोन्ही बाजूने आपलीच सेना ही खरी शिवसेना आहे, असा दावा केला जात आहे. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची? याबाबतचा फैसला आता निवडणूक आयोगाच्या दारात होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Eknath Shinde, Shivsena